पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३३७ दृश्यते न तस्य सा इति । भवतु तस्य एव सा । सा तु चेतनात् भवति इति ब्रूमः । तत्-भावे भावात् तत्-अभावे च अभावात् । यथा काष्ठादि-व्यपाश्रया अपि दाह-प्रकाशलक्षणा विक्रिया, अनुपलभ्यमाना अपि च केवले ज्वलने, ज्वलनात् एव भवति, तत्-संयोगे दर्शनात् तत्-वियोगे च अदर्शनात् , तद्वत् । लोकायतिकानां अपि चेतनः एव देहः अचेतनानां रथादीनां प्रवर्तकः दृष्टः, इति अविप्रतिषिद्धं चेतनस्य प्रवर्तकत्वम् ॥ ( शारीरकभाष्य २।२।२) ह्मणजे, ६ जर प्रधानवादी असें ह्मणेल की, केवळ चैतन्य रूप अशा कोणत्याही वस्तू मध्ये स्वतंत्रपणे प्रवृत्ति उत्पन्न केली जाते असे देखील आपल्या अनुभवाला येत नाहीं; तर हे त्याचे ह्मणणे आह्मांला मान्य आहे. तथापि ही गोष्ट अनुभवाने सिद्ध आहे की, रथ वगैरे ज्या चैतन्यरहित वस्तु, त्यांचा चैतन्यरूप वस्तूंशी संयोग झाला असता त्यांच्या मध्ये प्रवृत्ति उत्पन्न होते. परंतु जर प्रधानवादी असें ह्मणेल की, चैतन्यरूप वस्तूंचा चैतन्यरहित वस्तूंशी संयोग झाला, तरी देखील त्यांच्या मध्ये ( झणजे चैतन्यरूप वस्तू मध्ये ) प्रवृत्ति उत्पन्न होते, असे आपल्या अनुभवाला येत नाहीं; तर आतां या संबंधाने प्रश्न असा की, जी प्रवृत्ति उत्पन्न होते ती कोणाची,—ज्या चैतन्यरहित वस्तू मध्ये ती उत्पन्न होते त्यांची, किंवा ज्या चैतन्ययुक्त वस्तूंशी त्यांचा संयोग झाल्या मुळे ती उत्पन्न होते त्यांची ? या प्रश्नाला प्रधानवादी कदाचित् असे उत्तर देईल कीं, ती प्रवृत्ति त्या ( १ ) ह्मणजे चैतन्यरूप वस्तु सर्वथैव प्रवृत्तिरहित असून त्या कार्य उत्पन्न करण्याला असमर्थ असतात.