पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य । २३९ विद्यमान असत नाहीं. ज्या प्रमाणे जाळणे व प्रकाशणें है। धर्म जरी केवळ अग्नी मध्ये दिसत नाहींत, काष्ठ वगैरे वस्तू मध्ये दिसतात; तथापि ते अग्नी पासूनच उत्पन्न होतात; कारण काष्ठ वगैरे वस्तूंचा अग्नीशी संयोग झालेला असेल, तरच त्यांच्या मध्ये ते विद्यमान असतात, एरवीं असत नाहीं; त्या प्रमाणे चैतन्यरूप वस्तू पासूनच प्रवृत्ति उत्पन्न होते. या सिद्धांताच्या विरुद्ध लोकायतिकांचे देखील मत नाही. कारण ते असेच ह्मणतात कीं, चैतन्ययुक्त जो देह त्याच्या पासूनच रथ वगैरे चैतन्यरहित वस्तू मध्ये प्रवृत्ति उत्पन्न होते.' । पुनः शंकराचार्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, चैतन्यरहित प्रधाना पासून पुरुषार्थाला साधनीभूत असे जग उत्पन्न होते, या सिद्धांताचे अनुमान करण्याला एक देखील दृष्टांत मिळणे शक्य नाहीं: स्यात् एतत् । यथा क्षीरं अचेतनं स्वभावेने एव वत्स–विवृद्धि-अर्थ प्रवर्तते, यथा च जलं अचेतनं स्वभावेन एव लोक-उपकाराय स्यन्दते, एवं प्रधानं अचेतनं स्वभावेन एव पुरुष-अर्थसिद्धये प्रवर्तष्यते इति । न एतत् साधु उच्यते । यतः तत्र अपि पयः-अंबुनोः चेतन-अधिष्ठितयोः एव प्रवृत्तिः इति अनुमिमीमहे । उभय-वादि-प्रसिद्धे रथादौ अचेतने केवले ( १ ) केवल-अचेनस्य मृदादेः अदृष्टा अपि प्रवृत्तिः, तथाभूतस्य अन्यस्य दृष्टा, इति अचेतन–कारणत्व-पक्षे अपि प्रवृत्तिः संभवति इति शंकित्वा परिहरति ॥ ( आनंदगिरि ) । - ( २ ) क्षीरस्य अपि चेतन अधिष्ठितस्य एवं प्रवृत्तिः इति । आशंक्य विशिनष्टि- स्वभावेन । इति ॥ ( आनंदगिरि )...