पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२१ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य समता किंवा साम्यावस्था;-ह्मणजे त्यांची अशी स्थिति कीं, तिच्या मध्ये त्यांच्या पैकी कोणताही एक दुस-या कोणत्याही एका पेक्षा कमी किंवा अधिक असत नाहीं. सत्त्व= गुण हा सुखस्वभाव असून तीव्रबुद्धि व ज्ञान हे त्याचे परिणाम आहेत, रजोगुण हा दुःखस्वभाव असून क्रिया व उद्दीपन हे त्याचे परिणाम आहेत, आणि तमोगुण हा मोहस्वभाव असून मांद्य व प्रतिबंधकता हे त्याचे परिणाम आहेत. या तिहीं पैकी कोणताही गुण इंद्रियगोचर नसल्या मुळे केवळ त्यांच्या या परिणामांच्या योगानेच त्यांचा निर्देश करितां येतो किंवा त्यांच्या मधील भेद दाखविता येतो. या तीन गुणांच्या समतेने बनलेली जी प्रकृति ती स्वतः एक व अचेतन असून, पुरुष नामक जे सचेतन जीवात्मे त्यांच्या उपभोगा संबंधानें व मुक्ती संबंधाने व्यापार करिते. तसेच ती नित्य, सर्वव्यापि, निरंतर क्रिया करीत राहणारी, आणि विद्यमान अशा सर्व जड वस्तूंचे मूळ कारण असून ती कोणत्याही कारणाचे कार्य नाहीं. । एतद्रूप जी प्रकृति तिच्या पासून महत् वगैरे सात विकार किंवा कार्ये उत्पन्न होतात, व त्यांच्या पासून इतर सर्व कार्ये उत्पन्न होतात. हे सात विकार ह्मणजे महत् , अहंकार, आणि शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श, या पांच तन्मात्रा. यां पैकीं जो अहंकार त्याचे वैकारिक, तैजस, आणि भूतादि, असे तीन प्रकार आहेत. वैकारिक अहंकारा मध्ये सत्त्वगुण प्रबळ असून त्याच्या पासून इंद्रिये उत्पन्न होतात; भूतादि अहंकारा मध्ये तमोगुण प्रबळ असून त्याच्या पासून ज्या तन्मात्रांच्या योगाने पांच महाभूते बनतात त्या तन्मात्रा उत्पन्न