पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૨૨ वैदिक तत्त्वमीमांसा होतात. तैजस अहंकारा मध्ये रजोगुण प्रबळ असून तो वैकारिक अहंकाराला आणि भूतादि अहंकाराला साहाय्य करितो. आकाश वगैरे पांच महाभूते, कर्ण वगैरे पांच ज्ञानविषयक इंद्रियें, वाणी वगैरे पांच कर्मविषयक इंद्रिये, आणि मन, हे सोळा केवळ विकार होत. पुरुष ( ह्मणजे जीवात्मा ) अविक्रिय असल्या मुळे तो कोणत्याही कार्याचे कारण नव्हे किंवा कोणत्याही कारणाचे कार्य नव्हे. अर्थातच, तो धर्मरहित, केवळ चैतन्यस्वरूप, नित्य, क्रियारहित, सर्वव्यापी, आणि प्रत्येक शरीरांत निराळा, असा आहे. जीवात्मा अविक्रिय आणि क्रियारहित असल्या मुळे त्याच्या मध्ये कर्तृत्व किंवा भोक्तृत्व हे धर्म विद्यमान असणे शक्य नाहीं. तथापि जीवात्मा वस्तुतः असा आहे तरी, ज्या प्रमाणे स्फटिका वर जास्वंदीच्या फुलाच्या तांबडेपणाचा आरोप केला जातो त्या प्रमाणे, तो प्रकृतीच्या केवळ संनिध असतो एवढ्याच वरून, अज्ञान मनुष्यप्राणी जीवात्म्याच्या चैतन्याचा प्रकृती वर आरोप करतो, च प्रकृतीच्या कर्तृत्वाची जीवात्म्या वर आरोप करितो; आणि त्या आरोपा मुळे त्याला असे वाटते की, मी कर्ता भोक्ता असा आहे. या अज्ञानाच्या योगाने जीवात्म्याला भोग उत्पन्न होतो. आणि हे अज्ञान नष्ट होऊन ज्ञान प्राप्त झालें, झणजे त्याला मुक्ति प्राप्त होते. सांख्यांच्या मताच्या सर्व अंगांचा हा संक्षेप झाला. आपल्या प्रस्तुत प्रश्ना संबंधानें जो सांख्यांच्या मताचा भाग तो रामानुजाचार्यांच्या भाषेने असाः-ते च एवं वर्णयन्ति । कृत्स्नस्य जगतः एक-मूलवं अवश्य-अभ्युपगमनीयम् ।