पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ वैदिक तत्त्वमीमांसा मतें चैतन्य में एक स्वतंत्र तत्त्व असणे शक्य नसल्या मुळे, ते जड तत्त्वांचा धर्म असले पाहिजे. परंतु जर लोकायतिक असे ह्मणेल कीं, भूत व भौतिक वस्तू विषयीं जो अनुभव तो अनुभव ह्मणजेच चैतन्य, तर चैतन्य हा त्या वस्तूंचा धर्म आहे असे त्याला ह्मणतां येणार नाहीं, कारण भूत व भौतिक वस्तु त्या अनुभवाचे विषय असल्या मुळे तो अनुभव त्या वस्तूंचा धर्म असणे शक्य नाहीं. कारण कोणतीही वस्तु स्वतः वर क्रिया करू शकत नाहीं. उदाहरणार्थ, अग्नि उष्ण असतो तथापि तो स्वतःला दग्ध करूं शकत नाहीं, नट नाट्यकले मध्यें निपुण असतो तथापि तो स्वत:च्या स्कंधा वर चढू शकत नाहीं. उलट पक्षीं, जर चैतन्य हे भूत व भौतिक वस्तूंचा धर्म असेल, तर ते त्या वस्तु जाणू शकणार नाहीं. रूप वगैरे जे भूत व भौतिक वस्तूंचे धर्म, ते स्वतःचे किंवा इतरांचे रूप जाणू शकत नाहींत. परंतु ही गोष्ट निर्विवाद आहे कीं, चैतन्या कडून बाह्य आणि अंतस्थ भूत व भौतिक वस्तु जाणिल्या जातात. या करितां ज्या प्रमाणे भूत व भौतिक वस्तू विषय अनुभव सत्य आहे असे आपण मानितों, त्या प्रमाणेच आपणांला असे देखील मानिले पाहिजे कीं, तो अनुभव (ह्मणजे चैतन्य) त्या भूत व भौतिक वस्तूंहून भिन्न किंवा स्वतंत्र आहे. आणि ही गोष्ट एकदा कबूल केली ह्मणजे मग जीवात्मा देखील देहाहून भिन्न किंवा स्वतंत्र आहे, असे कबूल केले पाहिजे. कारण तो ( ह्मणजे जीवात्मा ) * मी आहे" एतद्रूप अनुभवस्वरूप आहे. तसेच, हा अनुभव सर्वदा एकरूप असल्या मुळे तो ( आणि ह्मणून जीवात्मा देखील ,