पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २१५ असतात या करितां ते देहाचे धर्म असे मानावयाचे; तर देह विद्यमान असून देखील त्याच्या मध्ये ते धर्म विद्यमान नसतात, या करितां ते देहाचे धर्म नव्हत असे मानले पाहिजे. कारण या संबंधाने ते देहाच्या धर्माहून भिन्न ठरतात. रूप वगैरे जे कोणत्याही देहाचे धर्म, ते तो देह विद्यमान आहे तो पर्यंत विद्यमान असतात. परंतु प्राण वगैरे जे आध्यात्मिक धर्म मृत्यू नंतर देह विद्यमान असून देखील विद्यमान असत नाहीत. दुसरे असे की, रूप वगैरे जे एका मनुष्याच्या देहाचे धर्म ते दुसन्या मनुष्याला दृश्य असतात; परंतु चैतन्य, स्मृति, वगैरे जे (आत्मवादीच्या मते ) जीवात्म्याचे धर्म ते दुसन्याला दृश्य असत नाहींत. ही गोष्ट देखील लक्षात ठेविली पाहिजे की, जरी देहाच्या विद्यमानते मध्ये हे धर्म विद्यमान असतात असे आपणांला निश्चित करतां येते; तरी देहाच्या अभावी ते नष्ट होतात, असे मानण्याला कांहीं आधार नाही. कारण हा देह नष्ट झाल्या वर कदाचित् ते दुसन्या देहा मध्ये प्रवेश करून विद्यमान राहत असतील. आणि या प्रमाणे ते विद्यमान राहतात किंवा नाहीं या विषयीं जरी संशय असला, तरी त्या संशयाने प्रतिपक्ष्याचे (ह्मणजे लोकायतिकांचे) मत असत्य ठरते. लोकायातकांना असा एक प्रश्न विचारला पाहिजे की, त्यांच्या मते जे चैतन्य पृथ्वी वगैरे जड द्रव्यां पासून उत्पन्न होते, त्या चैतन्याचे स्वरूप काय ? त्यांना हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की, चार जड तत्त्वांहून भिन्न किंवा स्वतंत्र असे कोणतेही तत्त्व विद्यमान आहे, असे ते मानीत नाहींत. अर्थात् , त्यांच्या