पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ वैदिक तत्त्वमीमांसा तर त्या ग्रंथकाराचे किंवा वक्त्याचें जें एकंदरीत मत किंवा त्याचा उद्देश त्याच्या अनुरोधाने त्याच्या निरनिराळ्या लेखांचा किंवा भाषणांचा अर्थ केला पाहिजे. मात्र ज्यांचे शब्द प्रमादांक्षम (infallible ) मानले जात नाहीत, अशा ग्रंथकारांनीं योजिलेल्या भाषेची बरीच * ओढाताण' करून देखील जर त्यांच्या ग्रंथांतील विचारांची संगति जुळवितां आली नाहीं, तर मग त्यांच्या विचारांत, तेवढ्या पुरती विसंगतता कबूल केली पाहिजे. । आतां याठिकाणी असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, जर कोणत्याही ग्रंथकाराच्या विचारांची संगति लावण्याचा प्रयत्न करण्याकरितां त्याच्या भाषेची ओढाताण । करू देणे क्षम्यच नव्हे तर आवश्यक देखील आहे, तर मग ती * ओढाताण' किती करू द्यावयाची १ या प्रश्नाला उत्तर असे की, या संबंधानें कोणताच सार्वत्रिक नियम निर्दिष्ट, करितां येणे शक्य नाहीं. कोणत्याही ग्रंथांतील विचारांची सत्यता किंवा संगति दाखविण्याकरितां त्याच्या भाषेची किती * ओढाताण' करावयाची, हे त्या ग्रंथकाराच्या पुज्यत्वासंबंधानें व विद्वत्तेसंबंधाने भाष्यकाराचे ॐ मत असेल, त्यावर अवलंबून राहील. जर भाष्यकाराच्या मते तो ग्रंथकार अत्यंत पूँज्य व, मूळ ग्रंथांत ज्या विषयाचे त्याने विवेचन केलें आहे त्या बिषयाच्या दृष्टीने अत्यंत विद्वान् असेल, तर तो वरील हेतूने