पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | १७ प्रसंगी त्या ग्रंथकाराच्या भाषेची इतकी * ओढाताण करील की, ती इतरांना अक्षम्य वाटेल, । परंतु जर ही गोष्ट मनुष्याने केलेल्या ग्रंथांच्या अर्थासंबंधानें खरी, तर उपनिषदे वगैरे जे ग्रंथ ईश्वरप्रणीत अशी शंकराचार्य, रामानुजाचार्य इत्यादि भाष्यकारांची श्रद्धा, त्या ग्रंथांतील विचारांची सत्यता व संगति सिद्ध करण्याकरितां त्यांतील भाषेची किती ओढाताण' करावी, याविषयी अर्थातच ते भाष्यकार कोणतीच इयत्ता मान्य करणार नाहीत, हे सांगण्याची आवश्यकता नाही. किंवा याविषयी ते भाष्यकार एकच इयत्ता मान्य करतील. आणि ती इयत्ता ही की, त्या ग्रंथांतील विचारांचे सत्यत्व व त्यांची सुसंगति सिद्ध करण्याकरितां त्यांतील भाषेची ज्या दिशेने व जितकी * ओढाताण' करावी लागेल त्या दिशेने व तितकी केली पाहिजे; भिन्न दिशेने किंवा त्याहून अधिक करितां नये. सारांश, मूळ ग्रंथांतील सर्व विचारांचे सत्य प्रतिपादन करणे हा भाष्यकारांचा मुख्य उद्देश असल्या मुळे, ज्या वाक्याचा लौकिक शब्दार्थ घेतला असता त्या | वाक्याने असत्य विचार व्यक्त होतो, त्या वाक्याचा लौकिक अर्थ न घेतां असाच अर्थ केला पाहिजे की, त्या वाक्याने सत्य विचार व्यक्त होईल, उदाहरणार्थ, शंकराचार्यांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे की, प्रत्यक्षादि प्रमाणांनी सिद्ध होणा-या ज्या गोष्टी