पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २०७ उत्पत्ति, व कारणा शिवाय ज्ञानाची व नाशाची शक्यता, या गोष्टी जर ख-या असत्या, तर जे उद्योग करीत नाहींत त्यांना देखील सर्व इष्ट गोष्टी प्राप्त झाल्या असत्या. परंतु वस्तुस्थिति अशी आहे कीं, प्रयत्नांच्या योगानेच इष्ट गोष्ट प्राप्त होते, किंवा अनिष्ट गोष्टीचे निवारण होते. जर सर्व वस्तु क्षणिक असल्या, तर पूर्व काळची वस्तु किंवा त्या वस्तू पासून उत्पन्न झालेला संस्कार किंवा अज्ञान वगैरे कोणताही विशेष परिणाम उत्तर काळीं शिल्लक राहणे अशक्य झाले असते. आणि त्या मुळे कोणतीही इष्ट गोष्ट प्रयत्नाने प्राप्त झाली नसती. आणि जर प्रत्येक इष्ट गोष्ट कारणा शिवाय प्राप्त झाली असती, तर जे प्रयत्न करीत नाहींत, त्यांना देखील इहलोकींच्या व परलोकींच्या सर्व इष्ट गोष्टी, इतकेच नव्हे तर मोक्ष देखील,-प्राप्त होणे शक्य लें असतें. इ