पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ वैदिक तत्त्वमीमांसा ( १५ ) या प्रमाणे अंतस्थ जग किंवा बाह्य जग विद्यमान नाहीं असे प्रतिपादन करणारा शून्यवाद; अंतस्थ जग मात्र विद्यमान आहे बाह्य जग विद्यमान नाही, असे प्रतिपादन करणारा विज्ञानवाद; आणि अंतस्थ जग व बाह्य जग ही दोन्ही विद्यमान आहेत, मात्र अंतस्थ व बाह्य जगांतील प्रत्येक वस्तु क्षणिक आहे, असे प्रतिपादन करणारा सर्वास्तित्ववाद; ही तिन्ही मते असत्य आणि ह्मणून अग्राह्य आहेत, असे ज्या अर्थी शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी विस्तरशः प्रतिपादन केले आहे; त्या अर्थी असे सिद्ध होते की, त्या दोघांच्याही मते अंतस्थ जग व बाझ जग ही दोन्ही विद्यमान असून, त्यांतील वस्तु प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने अनुभवाला येतात त्या प्रमाणेच त्या स्थिर आहेत. तर आतां प्रश्न असा की, जीवात्मा विद्यमान आहे किंवा नाहीं ? | वैदिक वाङ्मया मध्ये असे एक मत उपलब्ध आहे कीं अंतस्थ व बाह्य जग विद्यमान असून त्यांतील वस्तु स्थिर अंतस्थ व बाह्य जग विद्यमान आहे किंवा नाही, आणि जर तें विद्यमान आहे तर ते क्षणिक आहे किंवा स्थिर आहे, या प्रश्नां संबंधाने निर्णय करितांना शंकराचार्यांचे पुढील उद्गार नेहमी लक्षात ठेवण्या सारखे आहेतः- यदा हि लोक-प्रसिद्धः पदार्थः परीक्षकैः न परिगृह्यते, तदा स्व-पक्ष-सिद्धिः पर-पक्ष-दोषः वा उभयं अपि उच्यमानं परीक्षकाणां आत्मनः च यथार्थत्वेन न बुद्धि संतानं आरोहति । एवं एव एषः अर्थः इति निश्चितं यत् तत् एवं वक्तव्यम् । ततः अन्यत् उच्यमानं बहुप्रलापत्वं आत्मनः केवलं अख्यापयेत् ॥ (शारीरकभाष्य, २।२।२५ )