पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०६ वैदिक तत्त्वमीमांसा वाटणे शक्य नाहीं, या करितां भिन्न काळीं अनुभविलेल्या वस्तु एकमेकां सारख्या असल्या मुळे त्या एकरूपच आहेत असा भ्रम होतो, असे जो प्रतिपादन करील त्याने जीवात्म्याचे स्थिरत्व कबूल केलेच पाहिजे. आणि दुसरे असे की, ज्या प्रमाणे ज्वाळादिकां मधील भिन्नत्व प्रत्यक्षादि ज्ञानविषयक साधनांच्या योगाने आपणांला समजल्या मुळे त्या केवळ एकमेकां सारख्या आहेत,-एकरूप नव्हत,- असे आपण मानितों; त्या प्रमाणे घट वगैरे वस्तू मधील भिन्नत्व कोणत्याही साधनाने समजणे शक्य नसल्या मुळे त्या केवळ एकमेकां सारख्या आहेत,- एकरूप नव्हत,-असे मानण्याला कांहीं आधार नाहीं. अर्थातच, स्मृतीच्या योगानें सिद्ध होणारे जे पदार्थांचे स्थिरत्व ते सत्य नव्हे असे कोणत्याही रीतीने सिद्ध करितां येणे शक्य नाही.' सर्वास्तित्ववादीचे मत ग्राह्य नव्हे असे दाखविण्या करितां रामानुजाचार्यांनी दिलेले आणखी एक कारण असेः–एवं क्षणिकत्व-असत् - उत्पत्ति-अहेतुक-विज्ञाननाशादि-अभ्युपगमे उदासीनानां अनुसुंजानां अपि सर्वअर्थ-सिद्धिः स्यात् । इष्ट-प्राप्तिः अनिष्ट-निवृत्तिः वा प्रयत्नादिभिः साध्यते । क्षण-ध्वंसे हि सर्वेषां भावानां पूर्वपूर्व-वस्तु तत्-गतः वा विशेषः संस्कारादिकः अविद्यादिः वा उत्तरत्र न कश्चित् अनुवर्तते इति प्रयत्नादिभिः साध्यं न किंचित् अस्ति । एवं सति अहेतु-साध्यत्वात् सर्व-सि- द्धीनां उदासीनानां अपि ऐहिक–आमुष्मिक-फलं मोक्षः । च सिध्येत् ॥ ( श्रीभाष्य, २।२।२६ ) ह्मणजे, “ या प्रमाणे वस्तूचे क्षणिकत्व, अभाव पासून भावरूप वस्तूंची