पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २०३ झाल्या तर त्यांचे मृत्तिका वगैरे द्रव्यां मध्ये रूपांतर होते, असे आपण प्रत्यक्ष पाहतों. व या वरून असे सिद्ध होते की, कोणत्याही भावरूप वस्तूचा नाश होणे ह्मणजे तिला भिन्न अवस्था प्राप्त होणे. आणि असे असल्या मुळे ही मोष्ट देखील कबूल केली पाहिजे कीं, दिव्याची ज्योत नष्ट होते तेव्हा तिचा अत्यंत नाश होत नाहीं; तर तिला भिन्न स्थिति प्राप्त होते. मात्र तिला प्राप्त झालेली ही नवीन अवस्था सूक्ष्म असल्या मुळे त्या ज्योतीचे हे रूपांतर आपणांला दिसत नाहीं.' दुसरे असे की:-क्षणिकत्व-वादिभिः अभ्युपेतात् तुच्छत् उत्पात्तः, उत्पन्नस्य तुच्छता-आपत्तिः न च संभवति इति उक्तम् । तत्-उभय-प्रकार-अभ्युपगतः दोषः च भवति । तुच्छात् उत्पत्तौ तुच्छात्मकं एवं कार्यं स्यात् ।। यत् हि यस्मात् उत्पद्यते तत् तत्-आत्मकं दृष्टं, यथा मृद्-सुवर्णादेः उत्पन्नं मणिक-मुकुटादि मृद्-सुवर्णादिआत्मकं दृष्टम् । न च जगत् तुच्छात्मकं दृष्टं भवद्भिः अभ्युपगम्यत, न च प्रतीयते । सतः निरन्वय–विनाशे सति एक–क्षणात् ऊध्र्वे कृत्स्नस्य जगतः तुच्छता-आपत्तिः एवं स्यात् । पश्चात् तु तुच्छात् जगत्-उत्पत्तौ अनन्तरउक्तं तुच्छ—आत्मकत्वं एवं स्यात् । अतः उभयथा अपि दोषात् न भवत्-उक्त–प्रकारौ उत्पात-निरोधौ ।। ( श्रीभाष्य, २।२।२२ ) ह्मणजे, ५ भावरूप वस्तु अभावा पासून उत्पन्न होतात, व भावरूप वस्तु नष्ट होतात तेव्हां त्या अभावरूप होतात; असें जें सर्वास्तित्ववादी प्रतिपादन करितो, ते शक्य नाही असे सांगितले, सर्वास्तित्व