पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ वैदिक तत्त्वमीमांसा वादीची ही दोन्ही विधार्ने, सदोष आहेत. कारण अभावाः पासून उत्पन्न होणारे जे कार्य, ते अभावरूपच असले पाहिजे. कारण ज्या पासून जे उत्पन्न होते, तें तत्स्वरूप असते. उदाहरणार्थ, मृत्तिका सुवर्ण इत्यादिकां पासून उत्पन्न होणारौं जीं,-घट, मुकुट, वगैरे,-कार्ये ती मृत्तिकामय, सुवर्णमय अशीच असतात. परंतु सर्वास्तित्ववादीचेच असें ह्मणणे आहे की, जग शून्यमय किंवा अभावरूप नाहीं. आणि जग शून्यमय आहे असे आपल्या अनुभवाला देखील येत नाही. त्या प्रमाणेच, जे भावरूप आहे. ते अत्यंत नाश पावते असे जर गृहत धरिलें, तर सर्वास्तित्ववादीच्या मता प्रमाणे असे कबूल करावे लागेल की, या क्षण जे जग विद्यमान आहे ते सर्व या क्षणाच्या शेवटीं अत्यंत नाश पावेल. आणि असे मानले ह्मणजे मग असे देखील मानावे लागेल कीं, पुढच्या क्षणीं जें जर विद्यमान असेल ते अत्यंत अभावा पासून उत्पन्न होईल. परंतु, आतांचे सांगितल्या प्रमाणे, अभावा पासून उत्पन्न होणारे जे जग ते अभावरूपच असले पाहिजे. सारांश, सर्वास्तित्ववादीच्या प्रस्तुत दोन विधानां पैकी कोणतेही घेतले तरी ते सदोषच ठरते.' । | सवास्तित्ववादीच्या मताची असत्यता सिद्ध करण्या करितां रामानुजाचार्यांनी आणखी एक कारण दिले आहे, ते असेंः–पूर्व प्रस्तुतं वस्तुनः स्थिरत्वं एवं उपपाद्यत । अनुस्मरणं पूर्व-अनुभूत-वस्तु-विषये ज्ञानं प्रत्यभिज्ञ इत्यर्थः । तत् एव इदं इतिं सर्वं वस्तु-जातं अतीत का भूतं प्रत्यभिज्ञायते । न च भवद्भिः ज्वालादिषु इव । स