पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०३ वैदिक तत्त्वमीमांसा चेत् । न । घट–शरावादौ मृदादि-द्रव्य-अनुवृत्त-उपलब्ध्या, सतः द्रव्यस्य अवस्था अन्तर-आपत्तिः एव विनाशः इति निश्चिते सति, प्रदीपादौ सूक्ष्म-दशा-आपत्त्या अपि अनुपलंभ-उपपत्तेः, तत्र अपि अवस्था–अन्तरआपात्त-कल्पनस्य एव युक्तत्वात् ॥ ( श्री-भाष्य, २।२।२१ ) ह्मणजे, “पूर्वी असे सांगितले आहे की, कारणाच्या अभावी कार्य उत्पन्न होते असे जर मानिले, तर सर्व वस्तु सर्व ठिकाणीं सर्वदा उत्पन्न होतात असे मानले पाहिजे. ह्मणजे या मुळे अभावा पासून कार्याची उत्पत्ति होते, हे ( सर्वास्तित्ववादीचे ) विधान असत्य ठरते. उलट पक्षी, कोणतीही वस्तु ज्या क्षणीं उत्पन्न होते त्या क्षणीच ती नष्ट होते, हे विधान देखील सयुक्तिक नव्हे. कारण कोणत्याही वस्तूचा अत्यंत नाश होत नाहीं. कारण जें सत् ह्मणजे भावरूप किंवा विद्यमान आहे, त्याचा अत्यंत नाश होणे शक्य नाहीं. कोणतीही भावरूप वस्तु उत्पन्न होते किंवा नष्ट होते असे जे आपण ह्मणत किंवा समजतो, त्याचा अर्थ एवढाच की, तिला निरानराळ्या अवस्था प्राप्त होतात. परंतु जिला त्या भिन्न अवस्था प्राप्त होतात ती वस्तु नेहमी एकरूप असून स्थिर असते, असे आह्मी दुस-या ठिकाणीं प्रतिपादन केले आहे. सवस्तित्ववादी कदाचित् असें ह्मणेल की, ज्या अर्थी मालविलेल्या दिव्याची ज्योत अत्यंत नष्ट होते असे आपण प्रत्यक्ष पाहतो, त्या अर्थी इतर वस्तु देखील अत्यंत नाश पावतात असे अनुमान करणे हे असयुक्तिक नव्हे. परंतु हे अनुमान । बरोबर होणार नाही. कारण घट कलश वगैरे वस्तु नष्ट