पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य । ३०३ विद्यमान असणारी कोणती वस्तु पुढच्या क्षणीं उत्पन्न होणान्या कोणत्या वस्तूचे कारण या विषयीं, सर्वास्तित्ववादीच्या मताने, निश्चय करितां येणे शक्य नाहीं. आणि हा निश्चय हरितवं येण्या साठी जर सर्वास्तित्ववादी असे ह्मणेल की, मागच्या क्षणीं विद्यमान असलेली वस्तु ज्या स्थळीं असेल, त्याच स्थळाशी संबद्ध अशी जी पुढच्या क्षणीं उत्पन्न होणारी सजातीय वस्तु, त्या वस्तूचे तीः । (ह्मणजे मागच्या क्षणीं विद्यमान असलेली ) वस्तु कारण; तर स्थळ स्थिर आहे,-क्षणिक नव्हे, असे त्याने कबूल केले असे होईल. दुसरे असे की, ज्या पदार्थाशीं नेत्र वगैरे इंद्रियांचा संयोग होतो तो पदार्थ ज्ञानउत्पत्तीच्या क्षणा पूर्वीच नष्ट झाल्या मुळे, सवस्तित्ववादीच्या मताने, कोणत्याही पदार्था विषयीं जें ज्ञान उत्पन्न होते, त्या ज्ञाना विषयीं उपपत्ति ठरविता येत नाहीं.' | सर्वास्तित्ववादीच्या मताचे असत्यत्व सिद्ध करण्या करिता रामनुजाचार्यांनी आणखी एक कारण दिले आहे, ते असेंः असति अपि हेतौ कार्य उत्पद्यते चेत्, सर्वे सर्वत्र सर्वदा उत्पद्यत इति उक्तम् । ....एवं तावत् असतः उत्पत्तिः निरस्ता । सतः निरन्वय–विनाशः अपि वा उपपद्यते इति उच्यते 1.... कुतः ।.... सतः निरन्वय–विच्छेद-असंभुवात् । असंभवः च, सतः उत्पत्ति-विनाश नाम अवस्था-अन्तर–आपत्तिः एव, अवस्था–योपि तु द्रव्यं एकं एवं स्थिर इति.....अस्माभिः.... प्रतिपादितः (२।१११५ ) । निर्वाणस्य दीपस्य निरन्वय-विनाश नातु अन्यत्र अपि. विनाशः, निरन्वयः, अनुमीयते इति।