पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ वैदिक तत्त्वमीमांसा मानावयाच्या ? परंतु या तिहीं पैकी कोणताही पक्षांतर कबूल केला तरी तो त्याच्या मता विरुद्ध होतो. कारण उत्पत्ति व नाश एतद्रूप प्रत्येक वस्तूचे स्वरूप आहे असे मानलें, तर बस्तु हा शब्द आणि उत्पत्ति व नाश हे शब्द परस्परांचे पर्याय होतील; व त्या मुळे प्रत्येक वस्तु शाश्वत आहे असे मानावे लागेल. आता जर असे मानलें कीं, वस्तु आणि उत्पत्ति व नाश यांच्या मध्ये कांहीं भिन्नता असून उत्पत्ति व नाश यांच्या मध्यंतरीं विद्यमान असणारी जी वस्तु तिच्या त्या दोन भिन्न अवस्था आहेत; तर वस्तूच्या उत्पत्तिरूप अवस्थेचा क्षण, तिच्या विद्यमानतारूप अवस्थेचा क्षण, आणि तिच्या नाशरूप अवस्थेचा क्षण, या तीन क्षणांशी ती वस्तु संबद्ध आहे,-अर्थात् ती क्षाणक नाहीं, असे कबूल केले पाहिजे. आणि जर असे मानलें कीं, ज्या प्रमाणे घोडा आणि बैल या दोन वस्तूंची परस्परांहून अत्यंत भिन्नता, त्या प्रमाणेच उत्पत्ति आणि नाश या इतर कोणत्याही वस्तूहून अत्यंत भिन्न अशा वस्तु आहेत; तर त्यांचा तिला स्पर्श देखील होत नाहीं, अर्थात् , प्रत्येक वस्तु शाश्वत आहे, असे मानले पाहिजे. शेवटीं जर सर्वा स्तित्ववादी असे ह्मणेल की, कोणतीही वस्तु दृश्य झाली ह्मणजे ती उत्पन्न झाली, व अदृश्य झाली ह्मणजे ती नष्ट झाली, असे आपण ह्मणत; तर उत्पत्ति आणि नाश हे द्रष्ट्याचे धर्म आहेत वस्तूचे नव्हत–अर्थात् , प्रत्येक वस्तु शाश्वत आहे,-असे मानावे लागेल, या वरून देखील असे सिद्ध होते की, सर्वास्तित्ववादीचे मत विसंगत आणि ह्मणून अ ह्य आहे,