पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शैकराचार्य आणि रामानुजाचार्य । | १८५ शंकराचार्यांनीं क्षणिकत्ववादी विरुद्ध घेतलेले वरील सर्व आक्षेप टाळण्याला एक मार्ग आहे. आणि तो मार्ग हा की, कारणा शिवाय कार्य उत्पन्न होते असे प्रतिपादन करणे. परंतु (शंकराचार्यांच्या मते ) असे प्रतिपादन करणे सयुक्तिक नव्हे:-क्षणभंग-वादे पूर्व-क्षणः निरोध-ग्रस्तत्वात् ने उत्तरस्य क्षणस्य हेतुः भवति इति उक्तम् । अर्थ असति एवं हेतौ फल-उत्पत्तिं ब्रूयात् , ततः....निर्हेतुकायां.... उत्पत्तौ अप्रतिबन्धात्, सर्वे सर्वत्र उत्पद्येत । अथ उत्तरक्षण-उत्पत्तिः यावत् , तावत् अवतिष्ठते पूर्व–क्षणः इति ब्रूयात् , ततः यौगपद्य हेतु-फलयोः स्यात् । तथापि प्रतिज्ञा–उपरोधः एव स्यात् । क्षणिकाः सर्वे संस्काराः इति इयं प्रतिज्ञा उपरुध्येत ॥ ( शारीरंकभाष्य, २।२।२१ ) ह्मणजे, * सर्वास्तित्ववादीच्या मता प्रमाणे मागील क्षणीं उत्पन्न झालेली वस्तु त्याच क्षणीं नष्ट झाल्या मुळे, ती पुढील क्षणीं उत्पन्न होणान्या कोणत्याही वस्तूचे कारण होऊ शकणार नाही, असे येथे पर्यंत प्रतिपादन केले, आतां जर सर्वास्तित्ववादी असें ह्मणेल कीं, कारणाच्या अभावी देखील कार्य उत्पन्न होते; तर कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीला कारणाची आवश्यकता नसल्या मुळे, पाहिजे ती वस्तु पाहिजे त्या ठिकाणी किंवा पाहिजे त्या वेळीं उत्पन्न होईल, असे त्याला ह्मणावे लागेल. आणि जर तो असे ह्मणेल की, पुढच्या क्षणीं उत्पन्न होणारी कार्यरूप वस्तु उत्पन होई पर्यंत मागील क्षणची कारणेखूप वस्तु अस्ति (१) आदि-अन्तवन्तः भावाः संस्काराः, संस्क्रियन्ते समुत्प द्यन्ते इति व्युत्पत्तेः ॥ ( आनंदगिरि )