पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैदिक तत्त्वमीमांसा असला, झणजे ज्या मुख्य प्रश्नांचा निर्णय करून त्या ग्रंथांच्या गुणदोषांचे विवेचन केले पाहिजे, त्या मुख्य प्रश्नांपैकी एक, किंबहुना पहिला, प्रश्न असा की, भाष्यकारांनीं मूळ ग्रंथांतील वाक्यांचा जो अर्थ केला आहे तो बरोबर आहे किंवा नाहीं, ह्मणजे मूळ ग्रंथांतील वाक्यांचा तसा खरोखरच अर्थ होतो किंवा नाहीं ? उपनिषदें, गीता, व ब्रह्मसूत्रे या ग्रंथांतील वाक्यांचे किंवा विचारांचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ या दृष्टीने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या भाष्यरूप ग्रथांसंबंधाने हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, यांत तिळप्राय संशय नाही. मात्र एवढी गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, या प्रश्नाचा विचार करतांना मूळ ग्रंथांतील प्रत्येक वाक्य वेगळे घेऊन, भाष्यग्रंथामध्ये त्या वाक्याचा अर्थ केलेला आहे, तो त्याचा शब्दशः अर्थ आहे किंवा नाही ? असा विचार करणे, व तो त्याचा शब्दशः अर्थ नसला तर त्यासंबंधानें भाष्यकाराला दोष देणे, हे त्या ग्रंथकारासंबंधाने न्याय्य नव्हे व त्या भाष्यकारासंबंधाने देखील नाय्य नव्हे. आणि अशा रीतीने भाष्यरूप पंथांच्या गुणदोषांचे विवेचन केले तर सर्वच भाष्यकार,-प्राच्य व पाश्चात्य, प्राचीन व अर्वाचीन,-वरील दोषाला पात्र होतील. कारण ईश्वरप्रणीत आणि ह्मणून प्रमादाक्षम (infallible ) मानिलेला नाही, असा जरी एकादा विचारी किंवा सन्मान्य ग्रंथकाराचा ग्रंथ असला, तरी देखील त्या