पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ग्रंथांतील निरनिराळ्या वाक्यांचाच नव्हे, तर निरनिराळ्या भागांचा देखील असाच अर्थ करण्याचा प्रयत्न भाष्यकार करितो की, त्या निरनिराळ्या भागांतील विचारांमध्ये परस्परविरोध राहू नये. उदाहरणार्थ, पाश्चात्य राष्ट्रांमध्ये साक्रेटीसपासून मार्टिनोपर्यंत जे तत्त्वमीमांसक, आणि होमर पासून टेनिसनपर्यंत जे कवी, होऊन गेले आहेत, त्यांचे ग्रंथ जरी ईश्वरप्रणीत मानले जात नाहीत, तरी त्यांच्या ग्रंथांवर जे, विशेषतः त्यांना पूज्य मानणाच्या,-ना- मांकित पाश्चात्य पंडितांकडून भाष्यरूप ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत, त्यांतील कोणत्याही एका ग्रंथाचे जरी अध्ययन केले तरी देखील असे समजून येईल की, त्या कवीच्या किंवा तत्त्वमीमांसकाच्या विचारांची संगति जुळविण्याकरिता मूळ ग्रंथांतील वाक्यांची ठिकठिकाणीं, लौकिक भाषेनें, “औढाताण केली जाते. परंतु यावरून असे अनुमान करितां नये की, सर्व भाष्यकार या दोषाला पान्न आहेत, कारण वर निर्दिष्ट केलेल्या हेतूने मूळ ग्रंथांतील कांहीं कांहीं वाक्यांची सर्वच भाष्यकार ओढाताण' करितात, किंवा त्यांनी ती केली ह्मणून त्यांना कोणी दोष देत नाहीं, इतकेच नव्हे, तर तसे करणे हे प्रत्येक मर्मज्ञ भाष्यकाराचें एक मुख्य कर्तव्य आहे, असे मानले जाते. उदाहरणार्थ, पूर्वी ज्यांचा एकदा निर्देश केला आहे, त्या डॉ. केअर्डनी कॅट नामक जर्मन