पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य केले गेले, असे भाष्यकारांनी त्या त्या भाष्याच्या आरंभ स्पष्ट झटले आहे. उदाहरणार्थ, शंकराचार्यांनी आपल्या शारीरकभाष्याच्या उपोद्घातामध्ये असे ह्मणले आहेः - यथा च अयं अर्थः सर्वेषां वेदान्तानां तथा वयं अस्यां शारीरकमीमांसायां प्रदर्शयिष्यामः ॥ ह्मणजे, * सर्व उपनिषदांचा हाच ( ह्मणजे आत्मैकत्वाचे प्रतिपादन करणे हाच ) - हेतु आहे असे या शारीरक-मीमांसेमध्ये स्पष्ट करून दाखविलें जाईल. तसेच त्यांनी आपल्या गीताभाष्याच्या उपो.. खातामध्ये असे झटलें आहेः–तत् इदं गीताशास्त्रं....दुर्विज्ञेयार्थम् ।...अहं विवेकतः अर्थनिर्धारणार्थ संक्षेपतः विव- . रणं करिष्यामि ॥ ह्मणजे, ' गीताशास्त्राचा अर्थ समजणे कठीण आहे. याकरितां विवेकपूर्वक त्याच्या अर्थाचा निर्णय करितां यावा, ह्मणून मी त्याचे संक्षेपाने स्पष्टीकरण करीत आहे. ' रामानुजाचार्यांनी देखील ब्रह्मसूत्रांवरील आपल्या . श्रीभाष्याच्या आरंभी असेच ह्मटलें आहेः--भगवत्-बौधाय नकृतां विस्तीर्णा ब्रह्मसूत्रवृत्तिं पूर्वाचार्याः संचिक्षिपुः ।। तन्मतानुसारेण सूत्र-अक्षराणि व्याख्यास्यन्ते ॥ ह्मणजे, ‘ब्रह्म-त्रच सूत्रांवर भगवान् बौधायनांनी जे भाष्य केलें, व ज्याकली भाष्यासंबंधाने लहान लहान ग्रंथ या पूर्वीच्या आर्चायांनी तर लिहिले, त्या भाष्याला अनुसरूनच ब्रह्मसूत्रांचा शब्दार्थ स्पष्ट केला जात आहे.' आतां शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या भाष्यरूप ग्रंथांचा, ती केवळ भाष्ये या दृष्टीने विचार करावयाचा