पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वैदिक तत्त्वमीमांसा

त्यांनी आपापल्या भाष्यरूप ग्रंथांमध्ये उपनिषद्-कारांचीं, ब्रह्मसूत्रकारांची व गीताकारांची मते म्हणून ज्या मतांचें प्रतिपादन केले आहे, तीच त्यांची स्वतःची ( म्हणजे त्यांना निःसंशयपणे सर्वथैव मान्य अर्शी ) मते, असे समजणे

आवश्यक आहे. अर्थातच, उपनिषदें, ब्रह्मसूत्रे, व गीता या ग्रंथांमध्ये ज्या मतांचे निराकरण केलेले आहे असे त्यांनी प्रतिपादन केले आहे, ती मते त्यांच्या दृष्टीने त्याज्य आहेत असे समजले पाहिजे.

( २ )

 याप्रमाणे शंकराचार्यांची व रामानुजाचार्यांची मते ह्मणजे कोणती मते समजावयाचीं ? या प्रश्नाचा निर्णय झाला. आतां या निबंधाच्या प्रस्तुत भागाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवण्याविषयी वाचकांना विनंति करावयाची आहे. ती गोष्ट अशी. वरील विवेचनावरून असे ध्वनित होते की, शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांचे भाष्यरूप ग्रंथ दोन दृष्टींनी पाहणे आवश्यक आहे.दृष्टि अशी की, ते ग्रंथ ह्मणजे ब्रह्मसूत्रे, गीता, इत्यादि है ग्रंथांची केवळ भाष्यें,-ह्मणजे मूळ ग्रंथांतील वचनांचा दार्थ स्पष्ट करून त्यांत प्रतिपादिलेल्या मतांची संगति बविणारे ग्रंथे. आणि हे भाष्यरूप ग्रंथ याच हेतूने तयार


( १ ) सुत्रार्थः वपर्यते यत्र पदैः सूत्र नुसरिभिः । स्वपदानि च दन्ते आष्यं भाष्यविदः विदुः ॥