पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ९४५ अभाव दुसन्या विषयींचा अनुभव आपणांला कधीही प्राप्त होत नाही. परंतु जर ते परस्परांहून भिन्न असते, तर एका विषयींच्या अनुभवाच्या अभावीं दुसन्या विषयींचा अनुभव येण्याला अपरिहार्य असा कांहीं प्रतिबंध नसल्या मुळे, वरील गोष्ट शक्य झाली नसती. या वरून देखील असे सिद्ध होते की, बाह्य वस्तु विद्यमान नाहींत. सारांश, स्वप्ना मध्ये जो आपणांला अनुभव येतो, तशा प्रकारचाच जाग्रत्अवस्थे मध्ये देखील अनुभव येतो. ज्या प्रमाणे, बाह्य पदार्थांच्या अभावीं स्वप्न, जादु, मृगजळ, गंधर्वनगरी, इत्यादि विषयांचा ज्ञेय व ज्ञाता यांच्या रूपाने अनुभव येतो; त्या प्रमाणेच जाग्रत् अवस्थे मध्ये देखील स्तंभ वगैरे वस्तू विषयीं जो अनुभव येतो तो बाह्य वस्तूंच्या अभावींच येतो, असे मानिले पाहिजे. कारण स्वप्न–अवस्थे मध्ये येणारा अनुभव व जाग्रत्-अवस्थे मध्ये येणारा अनुभव या दोहों मध्ये अनुभव या दृष्टीने कांहींच भेद नाहीं. परंतु या ठिकाणी असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, जर बाह्य वस्तु विद्यमान नाहीत, तर निरनिराळ्या प्रकारची ज्ञानें कशी प्राप्त होतात? या प्रश्नाला ( विज्ञानवादीचे ) उत्तर असे कीं, पूर्व काळीं प्राप्त झालेल्या निरनिराळ्या प्रकारच्या विज्ञानरूप संस्कारां मुळे सांप्रत काळी निरनिराळ्या प्रकारची ज्ञानें प्राप्त होतात. प्रत्येक जीवात्म्याची बंधनरूप संसारस्थिति अनादि असल्या मुळे, पूर्व काळीं प्राप्त झालेले जे निरनिराळे संस्कार, त्या निरनिराळ्या संस्कारां पासून त्याला सांप्रत काळीं निरनिराळ्या प्रकारची (झणजे घट. विषयक, पटविषयक, स्तंभविषयक, इत्यादि) ज्ञाने प्राप्त हो