पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ वैदिक तत्त्वमीमांसा तात. व या ज्ञानां पासून नवीन संस्कार उत्पन्न होतात. या मुळे विज्ञानवाद में मत, आपणांला निरनिराळ्या प्रकारची ज्ञानें प्राप्त होतात, या वस्तुस्थितीच्या विरुद्ध नाही. कारण पूर्व काळच्या निरनिराळ्या बीजां पासून सांप्रत काळीं निरनिराळ्या प्रकारचे अंकुर उत्पन्न होतात; व सांप्रत काळच्या निरनिराळ्या अंकुरां पासून भविष्य काळीं निरनिराळीं बीजें उत्पन्न होतात; त्या प्रमाणेच निरनिराळ्या संस्कारां पासून निरनिराळ्या प्रकारची ज्ञानें उत्पन्न होतात, व त्या ज्ञानां पासून पुनः निरनिराळे संस्कार उत्पन्न होतात. निरनिराळ्या प्रकारची ज्ञानें उत्पन्न होतात ती निरनिराळ्या प्रकारच्या संस्कारां पासूनच होतात, ही गोष्ट अन्वयव्यतिरेकाच्या योगाने सिद्ध करून दाखविता येईल. कारण स्वप्ना मध्ये वगैरे बाह्य वस्तूंचा अभाव असून देखील निरनिराळ्या संस्कारां पासून निरनिराळ्या प्रकारची ज्ञानें प्राप्त होतात, ही गोष्ट दोन्ही पक्षांना कबूल आहे. आणि निरनिराळ्या संस्कारांच्या अभावीं केवळ बाह्य पदार्थांच्या विद्यमानते मुळे निरनिराळ्या प्रकारची ज्ञानें प्राप्त होतील, ही गोष्ट आह्मांला शक्य दिसत नाही. या वरून देखील असे सिद्ध होते की, बाह्य पदार्थ विद्यमान नाहींत.' रामानुजाचार्यांच्या भाषेने हे मत असेः–विज्ञानमात्रअस्तित्व-वादिनः योगाचाराः प्रत्यवतिष्ठन्ते । यत् उक्तं अर्थ-वैचित्र्य-कृतं ज्ञान-वैचित्र्यं इति, तत् न उपपद्यते, अर्थवत् ज्ञानानां एव साकाराणां स्वयं एव विचित्रत्वात् । तत् च स्वरूप-वैचित्र्यं वासनावशात् एव उपपद्यते । वासना च विलक्षण-प्रत्यय-प्रवाहः एव । यत् घटाकारं ज्ञान कपालाकार ज्ञानस्य उत्पादकं, तत् पूर्व-घटज्ञानं, तस्य