पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४। वैदिक तत्त्वमीमांसा दुसरे असे की, आपणांला केव्हांही जें जें ज्ञान होते त्या सर्व ज्ञानां मध्ये अनुभव हे एक सर्वसाधारण अंग विद्यमान असते. परंतु जरी सर्व ज्ञानां मध्ये अनुभव में एक साधारण अंग विद्यमान असते, तरी जें जें ज्ञान होते ते भिन्न भिन्न विषयां संबंधाने असते. उदाहरणार्थ कांहीं ज्ञान स्तंभा विषय असते, कांहीं ज्ञान भिंती विषयी असते, कांहीं ज्ञान घटा विषयी असते, कांहीं ज्ञान पटा विषयी असते. परंतु जर ज्ञाना-ज्ञाना मध्ये त्या त्या प्रकारचा भेद नसेल, तर में भिन्न भिन्न वस्तू विषयी ज्ञान प्राप्त होणे शक्य होणार नाहीं. अर्थातच, कोणतेही ज्ञान व त्याचा विषय यांचे रूप एकच असले पाहिजे. आणि ही गोष्ट कबूल केली ह्मणजे मग, ज्या अर्थी कोणत्याही ज्ञानाच्या विषयाचा आकार या ज्ञानाने आवृत असतो, त्या अर्थी त्या ज्ञानाहून भिन्न असा बाह्यवस्तुरूप त्याचा विषय विद्यमान आहे, असे मानणे निरर्थक होय. तिसरे कारण असे की, ज्या अर्थी कोणतेही ज्ञान व त्या ज्ञानाचा विषय या दोहोंचा आपणांला एकाच वेळीं अनुभव येतो, त्या अर्थी कोणतेही ज्ञान व त्या ज्ञानाचा विषय हे एकरूप आहेत असे मॉनिले पाहिजे. कोणतेही ज्ञान व त्याचा विषय यां पैकी एका विषयींच्या अनुभवाच्या (१) ज्ञानगत-विशेष-दृष्टि-अनुपपत्त्या नीलादि-आकारता तस्य सिद्धा, तथा च ज्ञान- आकारस्य एव विषयत्वात् व्यर्था बाह्य-अर्थकल्पमा गौरवत्वात् ॥ ( आनंदगिरि )। (२) यत् येन नियत-सहोपलंभनं तत् तेन अभिनं, यथा एकेन चंद्रमसा द्वितीयः चंद्रमाः । नियत-सहोपलंभनं च शेयं ज्ञानेन इयर्थः ॥ ( आनंदगिरि )।