पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ वैदिक तत्त्वमीमांसा ज्ञानवादीचे मत असे की, जरी ज्ञाता, ज्ञानसाधन, ज्ञानविषय, व ज्ञान, ही सर्व विद्यमान आहेत, तरी ती सर्व अंतस्थ ह्मणजे विज्ञानरूपच असून बुद्धीच्या व्यापारा वर अवलंबून राहतात. कारण जरी बाह्य पदार्थ विद्यमान असते, तरी ते जाणणे किंवा त्यांच्या विषयी ज्ञान प्राप्त होणे हे बुद्धीच्या साहाय्या शिवाय शक्य झाले नसते. परंतु या संबंधाने असा प्रश्न उत्पन्न होतो की, या सर्व गोष्टी अंतस्थ आहेत,-अंतस्थ जे विज्ञान त्याच्याहून भिन्न असे बाह्य पदार्थ विद्यमान नाहीत, असे प्रतिपादन करण्याला काय आधार आहे ? या प्रश्नाला ( विज्ञानवादीचे ) उत्तर असे की, बाह्य पदार्थ विद्यमान असणे शक्यच नाहीं. कारण प्रतिपक्षाने प्रतिपादित जे बाह्य पदार्थ ते परमाणुरूप असले पाहिजेत, किंवा स्तंभ वगैरे वस्तुं प्रमाणे परमाणूंचे समुदाय असले पाहिजेत. आतां जर बाह्य पदार्थ परमाणुरूप असतील, तर ( १ ) ननु मान-मेयादि-भेद-उपगमे कथं विज्ञानमात्र-वादः, अन्यथा कथं व्यवहार-सिद्धिः, तत्र आह- तस्मिन् ' इति । ज्ञानं एवं कल्पित-नीलादि-आकारतया मेयं, अवभास-आत्मतया फलं, तत्-शक्ति-आत्मना मानं, तत्-आश्रयतया माता, इति विज्ञान-वादे अपि कल्पित-मानादि-भेदं उपेत्य सर्व-व्यवहारसिद्धिः इत्यर्थः ॥ ( आनंदगिरि ) | ( २ ) मुख्यः एव भेदः किं न स्यात् , अतः आह-सति अपि इति । न हि बुद्धि-अनारूढस्य नीलादेः प्रमेयत्व-व्यवहारः अस्ति ।। अतः बुद्धि-आरूढ -आकारः एव प्रमेयं न बाह्य इत्यर्थः । ( गोचिदानंद )