पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १४३ ते स्तंभ वगैरे स्थूल पदार्थाच्या रूपाने जाणिले जाणार नाहींत. कारण परमाणु स्तंभादिविषयक ज्ञानाचा विषय होणे सर्वथैव अशक्य होय. अर्थात् , ज्ञेय जे बाह्य पदार्थ ते परमाणुरूप असणे शक्य नाही. तसेच, स्तंभ वगैरे जे ज्ञेय बाह्य पदार्थ ते परमाणूंचे समुदाय आहेत, असे देखील मानितां येत नाहीं. कारण तसे असेल तर ते पदार्थ परमाणुंहन भिन्न असले पाहिजेत किंवा अभिन्न असले पाहिजेत. परंतु ते परमाणंहून भिन्न आहेत असे मानतां येत नाहीं, किंवा अभिन्न आहेत असेही मानितां येत नाही. आणि अशाच विचारसरणीने असे सिद्ध करून दाखविता येईल की, ज्या प्रमाणे परमाणु व स्तंभादि पदार्थ यांच्या मध्ये अवयव–अवयवी एतद्रूप संबंध असणे शक्य नाहीं, त्या प्रमाणेच त्यांच्या मध्ये जाति-व्यक्ति किंवा धर्म-धम एतद्रूप देखील संबंध असणे शक्य नाहीं. ( १ ) एक-स्थूल-नील-आभास-ज्ञानस्य तत्-विपरीत--परमाणु-गोचरता-अयोगात्, न परमाणवः तावत् तत्-आलंबनं इति आह- तत्र ' इति ॥ ( आनंदगिरि ) | ( २ ) स्तंभादि-अवयविनां परमाणुभ्यः भेदे गो-अश्ववत् अत्यन्त-वैलक्षण्यम् । अभेदे परमाणुमात्रतया स्थूलरूपेण अवभास सिद्धिः, परम शूनां अतथात्वात् इति आह- तेषां ' इति ॥ ( आनंदभार ) ( ३ ) अवयव-अवयवि-रूपः बाह्य-अर्थः न अस्ति चेत्, मा भूत् । जाति-व्यकि-आदि-रूपः तु स्यात् इति आशंक्य आह* एवं ' इति । जाति आदीनां व्यक्ति-अदीनां च अत्यन्तभिन्नत्वे स्वातंत्र्य-प्रसंगात्, अत्यन्त-अभिन्नत्वे तद्वत् एव अतद्भादात् भिन्न-भिन्नस्य विरुद्धत्वात् अवयव-वयवि-भेदवत् जाति-व्यक्ति-दि-भेदः अपि न त इत्यर्थः ।। ( नंदगिरि)।