पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

|१३९ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य शून्यवादरूप मत तें असत्य आहे असे मानावे लागेल. आणि जर ते मत असत्य आहे असे मानले, तर सर्व आहे ते सत्-रूप आहे असे मानले पाहिजे. सारांश, जें आहे ते सर्व शून्य किंवा अभावरूप आहे, हे मत सर्वथैव असत्य होय.' शून्यवाद असत्य आणि ह्मणून अग्राह्य, असे शंकराचार्यांनी देखील प्रतिपादन केले आहे:-शून्यवादिपक्षः तु सर्वप्रमाणविप्रतिषिद्धः इति तत्–निराकरणाय न आदरः क्रियते । न हि अयं सर्व-प्रमाण-सिद्धः लोक–व्यवहारः अन्यत् तत्त्वं अनधिगम्य शक्यते अपन्होतुम् , अपवादअभावे उत्सर्ग-प्रसिद्धेः ॥ ( शारीरकभाष्य, २।२।३१ ) झणजे, “शून्यवादीचे हे मत ज्ञानविषयक सर्व साधनांच्या विरुद्ध असल्या मुळे, त्या मताचे निराकरण करीत बसणे योग्य दिसत नाही. कारण प्रत्यक्षादि सर्व ज्ञानसाधनांनी सिद्ध होणारे जे हे सर्व जग, ते जर त्या दृश्यमान रूपाने सत्य नव्हे, तर त्याचे काय स्वरूप, हे दाखविल्या शिवाय ते अभावरूप आहे असे ह्मणणे बरोबर नव्हे. कारण अपवादाच्या अभावानें सामान्य नियम सिद्ध होतो. या वरून असे स्पष्ट होतें कीं,-सर्वशक्ति सर्वज्ञ ब्रह्म व जीवात्माच नव्हे, तर बाह्य व अंतस्थ असे जे जग तें देखील अभावरूप आहे, हे मत शंकराचार्य व रामानुजाचार्य यांना मान्य नाहीं. अर्थात् , त्यांच्या मते ते त्याज्य होय. हे मत त्यांना ग्राह्य नाहीं असे निश्चित झाल्या वर (१) तत्र ज्ञान-अर्थयोः अभावः शून्यत्वं न युक्तं, प्रमाणैः तयोः उपलब्धेः ॥ ( आनंदगिरि )