पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ वैदिक तत्त्वमीमांसा धयिषता तस्य प्रमाणस्य सत्यत्वं अभ्युपेत्यम् । तस्य असत्यत्वे सर्व सत्यं स्यात् । इति सर्वथा सर्वशून्यत्वं च अनुपपन्नम् ॥ ( श्रीभाष्य, २।२।३० ) ह्मणजे, “या शून्यवादासंबंधाने आमचे ह्मणणे असे की, हे मत सयुक्तिक असणे शक्य नाही. कारण या मता प्रमाणे, सर्व सत् आहे असे मानावयाचे, किंवा सर्व असत् आहे असे मानावयाचे, किंवा सर्व सत् असत् दोन्ही आहे किंवा दोन्ही नाही असे मानावयाचें ? आणि या चार पक्षांतरां पैकी कोणताही एक गृहीत धरला तरी शून्यवाद असत्य ठरतो. कारण सत् ह्मणजे भाव आणि असत् ह्मणजे अभाव हे शब्द व त्या शब्दांनी व्यक्त होणारा अनुभव यांची, विद्यमान वस्तूंच्याच विशेष अवस्था व तद्विषयक अनुभव व्यक्त करण्या कारता, व्यवहारा मध्ये योजना केली जाते. ह्मणून जे आहे ते अभावरूप आहे असे प्रतिपादन करणे ह्मणजे, जे आहे ते विशेष अवस्था प्राप्त होण्याला योग्य आहे, असे प्रतिपादन करणे होय. अर्थात, या प्रतिपादनाने शून्यवाद सिद्ध होण शक्य नाहीं. शून्यवाद असत्य कां ? या विषयीं दुसरे एक कारण असे की, सर्व शून्यरूप किंवा अभावरूप आह असे जो प्रतिपादन करितो. त्याला कोणत्या तरी शा"" धनाच्या योगानें अभावाचे ज्ञान प्राप्त झालेले असले पाहिजे. परंतु त्या ज्ञानसाधनाने अभावाचे ज्ञान प्राप्त झाल्या मु ' अभावरूप आहे असे ज्या अर्थी तो प्रतिपादन करितो, अथ ते ज्ञानसाधन सत्-रूप आहे असे त्याच्याच ह्मण सिद्ध होते. कारण ते ज्ञानसाधन सत्-रूप नव्हे असे ता मानील, तर त्या असत्-रूप साधनाने सिद्ध केल | साधनाने सिद्ध केलेलें जें