पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १२३ त्याच्या ठिकाणी अनैश्वर्यादि दोष आहेत असे मानावे लागेल, असा आक्षेप घेण्याला कांहीं आधार नाही.' | आपल्या मता विरुद्ध कोणताचे आक्षेप घेता येणार नाहीं असे दाखविण्या करितां अनुमानवादी पुनः ह्मणतो:-- कुलालादीनां दण्ड-चक्रादि-अधिष्ठानत्वं शरीर-द्वारेण एव दृष्टे, इति जगत्-उपादान-उपकरण-अधिष्ठानं ईश्वरस्य अशरीरस्य । अनुपपन्नं इति चेत् । न । संकल्पमात्रेण एव पर-शरीरगत-भूत-वेताल–गरलादि-अपगम-विनाश-दर्शनात् । कथं अशरीरस्य ईश्वरस्य पर-प्रवर्तनरूपः संकल्पः इति चेत् । न शरीर-अपेक्षः संकल्पः । शरीरस्य संकल्पहेतुत्व-अभावात् । मनः एव हि संकल्प-हेतुः । तत् अभ्युपगतं ईश्वरे अपि ॥ ( श्रीभाष्य, १।१।३ ) ह्मणजे, ६ या संबंधाने कदाचित् असा आक्षेप घेतला जाईल की, घटादिकांचे कर्ते जे कुंभार वगैरे ते, घट वगैरे निर्माण करण्याला आवश्यक अशी जी दंड चक्र वगैरे साधने, त्यांचे आपल्या शरीराच्याच द्वारे नियमन करितात असा आपला अनुभव आहे. परंतु ईश्वर शरीररहित असल्या मुळे, जग उत्पन्न करण्याला आवश्यक अशी जी उपादान-उपकरणे, त्यांचे त्याला नियमन करितां येणे शक्य नाहीं. या आक्षेपाला उत्तर असे की, जर एकाद्या मनुष्याच्या शरीरांत | भूताने किंवा वेताळाने किंवा विषानें संचार केला, तर मत्री आपल्या केवळ संकल्परूप सामर्थ्याने त्याला शरीराच्या बाहेर काढितो किंवा त्याचा नाश करतो, ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. आणि या वरून असे स्पष्ट होते की, कोणत्याही वस्तूचे नियमन करण्याला त्या वस्तूशी शरीरसंसर्ग