पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

LU १२४ वैदिक तत्त्वमीमांसा झालाच पाहिजे असे नाही. अर्थात्, ईश्वर शरीररहित असून देखील आपल्या केवळ संकल्पाच्या योगाने जगोत्पत्तीच्या साधनांचे नियमन करू शकतो. परंतु ईश्वर शरीररहित असल्या मुळे, या साधनांचे नियमन करण्याला आवश्यक जो संकल्प, तो तरी ईश्वराच्या ठिकाणी उत्पन्न होणे शक्य आहे काय ? या आक्षेपाला उत्तर असे की, संकल्प उत्पन्न होणे किंवा न होणे हे शरीरावर अवलंबून असत नाही, केवळ मनावर अवलंबून असते; आणि ईश्वराला देखील मन आहे. - सारांश, अनुमानवादीचे ह्मणणे असे कींः–अतः विचित्र-अवयव-संनिवेश-विशेष-तनु-भुवनादि--कार्य-नि- मणे पुण्य-पाप-परवशः पारमित-शक्ति-ज्ञानः क्षेत्रज्ञः न प्रभवति, इति निखिल–भुवन-निर्माण-चतुरः अचिन्त्यअपारमित-ज्ञान-शक्ति-ऐश्वर्यः अशरीरः संकल्पमात्र-सा- धन-पारिनिष्पन्न-अनन्त-विस्तार-विचित्र-रचन-प्रपंचः पुरुष-विशेषः ईश्वरः अनुमानेन एव सिध्यति ।। ( श्रीभाष्य, १। १।३ ) ह्मणजे, * वरील सर्व विवेचना वरून असे सिद्ध हाते की, ज्याच्या अवयवांची रचना विलक्षण आहे असे जें प्राण्यांचे शरीर में जग, एतद्रूप में विशिष्ट कार्य तें उत्पन्न करण्याला, पापपुयाच्या योगाने परवश झालेला असून ज्याचे सामर्थ्य व ज्ञान परिमित आहे असा जो जीवात्मा, तो असमर्थ होय. या करितां सर्व जग निर्माण करण्याला आवश्यक असे अचिंय व अमर्याद ज्ञान । सामथ्र्य चातुर्य आणि ऐश्वर्य, हीं ज्याच्या मध्ये आहेत; जो शरीररहित असून आपल्या केवळ संकल्पाच्या योगाने,