पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ वैदिक तत्त्वमीमांसा येणार नाही. कोणतीही वस्तु काय आहे असे निश्चित झाल्या नंतर, ते कार्य निर्माण करण्याला आवश्यक असे जें सामर्थ्य व उपादान-उपकरण-विषयेक ज्ञान, ते त्या कार्याच्या कर्याच्या अंगी असले पाहिजे, असे अनुमानाने सिद्ध होते. परंतु इतर कार्ये निर्माण करण्याला आवश्यक असे जे सामर्थ्य व ज्ञान, त्याचा त्या कत्र्याच्या ठिकाणी अभाव आहे असे त्या वरून अनुमानाने सिद्ध होत नाही. कारण ज्या कार्या वरून त्याच्या कत्य विषयीं अनुमान करावयाचे, ते कार्य निर्माण केले जाघ्याला त्याच्या कर्त्या मधील या अभावाची,-ह्मणजे इतर काय विषय त्याच्या असामर्थ्याची व अज्ञानाची,-कांहींच आवश्यकता नसते. कोणतेही विशिष्ट कार्य उत्पन्न कर ण्याला आवश्यक असे जे त्या कार्या विषयांच्या उपादानउपकरणा संबंधाने ज्ञान, ते विशिष्ट कत्र्याच्या ठिकाण असल्या मुळे त्याने ते कार्य उत्पन्न केले असे सिद्ध होते. पुरंतु त्या कार्य विषयींच्या ज्ञाना बरोबरच इतर काय विष यचे अज्ञान वगैरे दोष जरी त्या कर्त्या मध्ये आहेत असे आढळून आले, तरी त्या कर्या कडून ते कार्य उत्पन्न केले जाण्याला त्या ज्ञाना प्रमाणेच हे अज्ञान वगैरे दोष देखील आवश्यक होते, असें ह्मणणे सयुक्तिक नव्हे. या करितां जगरूप कार्याहून भिन्न अशी जी कार्ये त्या काय वरून अनुमित जे त्यांचे कर्ते त्यां पैकी प्रत्येक कर्त्यांच्या अंगीं। अनीश्वरत्व वगैरे दोष आढळतात, ह्मणून जगत्कर्याच्या अंगीं । देखील ते दोष असले पाहिजेत असे ह्मणतां येत नाहीं. सारांश, अनुमानाच्या योगाने सिद्ध होणारा जो जगकर्ता