पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६
वैदिक तत्त्वमीमांसा

तत्-इतर लोकांना असें ह्मणतां येणे शक्य नाहीं की, शंकराचार्याची ( किंवा रामानुजाचायची ) मते काय होती, याविषयीं नि:संशयपणे निणय करणे कठीण आहे. फारच झाले तर शंकराचार्यांचे ( किंवा रामानुजाचार्यांचे ) अनुयायी असे ह्मणतील कीं, श्रुति किंवा वेदांत किंवा गीता या ग्रंथांमध्ये प्रतिपादन केलेली मते मान्य असणे यापेक्षां भिन्न अर्थाने त्यांची अशी मतेच नव्हती. अर्थात्, या ग्रंथांतील मते त्यांना सर्वथैव मान्य होती, व त्या मतांविषयी गैरसमज नष्ट होऊन इतरांना देखील तीच मते मान्य व्हावी, या हेतूने त्या मतांचें स्पष्टीकरण व समर्थन करण्याकरितां त्यांनी त्या ग्रंथांवर भाष्ये तयार केली. आणि याकरितां उपनिषदें, ब्रह्मसूत्रे, व गीता या ग्रंथांमध्ये उपदिष्ट ह्मणून ज्या मतांचे शंकराचार्यांनीं ( किंवा रामानुजाचायनी ) आपल्या भाष्यरूप ग्रंथांमध्ये प्रतिपादन केले आहे, या मतांपेक्षा त्यांची स्वतःची मते भिन्न होती, अशी शंका करणे हे, त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने, त्यांना अवमानकारक आहे. शंकराचार्यांच्या ( किंवा रामानुजाचार्यांच्या ) विरुद्ध पक्षाचे लोक तर स्पष्ट रीतीने असे वारंवार म्हणूतात की, आपल्या स्वत:च्या मतांचे प्रतिबिंब उपनिषदें, ब्रह्मसूत्रे, व गीता या ग्रंथांत पाहून, त्या ग्रंथांमध्ये उपदिष्ट म्हणून त्यांनी आपल्या स्वत:च्या मतांचेच आपल्या भाष्यरूप प्रेथांमध्ये प्रतिपादन केले आहे. म्हणजे या