पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शंकराचार्य आणि रामानुजाचार्य

पक्षाचे म्हणणे असे की, शंकराचार्यांच्या ( किंवा रामानु, जाचार्यांच्या ) भाष्यरूप ग्रंथांचे अध्ययन केल्याने उपनिघदें, ब्रह्मसूत्रे, व गीता या ग्रंथांमध्ये प्रतिपादन केलेली मते कळण्याची शक्यता नाही; तर केवळ त्यांची ( म्हणजे भाष्यकारांची ) स्वतःची मते काय होती एवढेच समजेल. अर्थात्, या पक्षांतील लोकांना देखील असें ह्मणतां येणार नाहीं कीं, शंकराचार्यांची ( किंवा रामानुजाचायची ) मते हुडकून काढण्याचे काम फार कठीण आहे. आतां राहले असे लोक की, ज्यांचा शंकराचार्यांच्या ( किंवा रामानुजाचायच्या ) अनुयायी वर्गातही समावेश होत नाही, किंवा त्यांच्या प्रतियोगी वगंतही समावेश होत नाही. परंतु अशा लोकांना देखील शंकराचार्यांची ( किंवा रामानुजाचार्यांचीं ) मते काय होती याविषयी निर्णय करणे कठीण नाहीं. कारण, वर सांगितल्याप्रमाणे, श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत, व ब्रह्मसूत्रे व गीता या ग्रंथांमध्ये श्रुतिग्रंथांतील सर्व मताचे सार । संग्रहीत आहे असे त्यांचे मत होते. अर्थातच, त्यांची स्वतःची मते, या ग्रंथांतील मते ह्मणून त्यांनी ज्या मतांचे प्रतिपादन केले आहे, त्या मतांहून भिन्न असणे शक्य नाहीं. ह्मणून तीच त्यांची मते असली पाहिजेत, असे या मध्यस्थ वर्गातील सर्व लोकांनी कबूल केले पाहिजे.

 सारांश, शंकराचार्यांची व रामानुजाचार्यांची मते ह्मणजे कोणती मते समजावयाची ? या प्रश्नाला उत्तर असे की,