पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शंकराचार्य आणि रामानुजाचार्य

मते निर्दिष्ट केलेली आहेत त्यांपैकी कोणती मते त्यांना स्वतःला मान्य होती व कोणती नव्हती, या विषयी निर्णय करण्याला खात्रीलायक असा कांहीं आधार नाहीं.
 परंतु थोडा विचार केला असता असे निःसंशयपणे दिसून येईल की, ही शंका सर्वथैव निराधार आहे. कारण उपनिषदें हे ईश्वरप्रणीत ग्रंथ, ब्रम्हसूत्रे हा उपनिषद्-वाक्यरूपी पुष्पांचा हार ( वेदान्तवाक्यकुसुमग्रन्थनार्थत्वं सूत्राणाम् ।) आणि गीता में वेद व वेदांत या सर्व ग्रंथांचे सार (तत् इदं गीताशास्त्रं समस्त-वेदार्थसार-संग्रह-भूतम् ।), असे शंकराचायौन स्पष्ट झटले आहे. ( आणि ही गोष्ट रामानुजाचार्यांना देखील मान्य होती, असे सांगण्याची आवश्यकता नाही. ) अर्थातच, शंकराचार्यांच्या (व रामानुजाचार्यांच्या ) मर्ते उपनिषदें, ब्रह्मसूत्रे, व गीता या तिन्ही ग्रंथांत प्रतिपादन केलेली मते अत्यंत निर्दोष असली पाहिजेत. आणि ज्या अर्थी त्या ग्रंथकारांची मते अत्यंत निर्दोष असे शंकराचायोना ( व रामानुजाचार्यांना ) वाटत होते, त्या अर्थी त्यांची स्वतःची मते त्या ग्रंथकारांच्या मतांपेक्षां भिन्न असणे शक्यच नाहीं. याकरितां, शंकराचार्यांनी ( किंवा रामानुजाचायनीं ) उपनिषद्-कारांचीं, ब्रह्मसूत्रकारांचीं, व गीताकारांची जी मते असे प्रतिपादन केले आहे, तीच त्यांची स्वतःची मते असे समजणे आवश्यक आहे.
 यावरून असे स्पष्ट होते की, शंकराचार्यांच्या ( किंवा रामानुजाचायच्या ) अनुयायी वर्गातील लोकांना किंवा