पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १०९ ब्रह्मणः, इदं ब्रह्मणा संबद्ध कार्य इति गृह्येत । कार्यमानं एव तु गृह्यमाणं किं ब्रह्मणा संबद्धं किं अन्येन केनचित् वा संबद्धं इति न शक्यं निश्चतम् ॥ ( शारीरकभाष्य, १।१।२ ) ह्मणजे, हा आक्षेप । सयुक्तिक नव्हे. कारण ब्रह्म में इंद्रियांच्या द्वारे ज्ञेय नसल्या मुळे, त्याचा जो जगाशी संबंध तो प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने जाणिला जाणे शक्य नाहीं. इंद्रियांचा स्वभावच असा आहे की, त्यांच्या योगाने जगरूप जे लौकिक | विषय ते मात्र जाणिले जातात, ब्रह्म जाणिले जात नाहीं. जर त्यांच्या योगाने ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होणे शक्य असते, तर हे जग ब्रह्माचे कार्य आहे असे प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने समजले असते. परंतु ज्या अर्थी जगरूप कार्य मात्र इंद्रियांच्या योगानें ज्ञेय आहे, त्या अर्थी ते ब्रह्मरूप कारणाचे कार्य किंवा दुस-या कोणत्याही कारणाचे कार्य, हे प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने ठरविणे शक्य नाही.' अर्थात, ते ठरविण्याला श्रुतीचे साहाय्य पाहिजेः-न चे परिनिष्ठित-वस्तु-स्वरूपत्वे अपि प्रत्यक्षादि-विषयत्वं ब्र ह्मणः । तत् त्वं असि' इति ब्रह्मात्म-भाषस्य शास्त्रं, अन्तरेण अनवगम्यमानत्वात् ।.... तस्मात् सिद्धं ब्रह्मणः शास्त्र-प्रमाणकत्वम् ॥ ( शारीरकभाष्य, १।१।४ ) ह्म जे, “ ब्रह्म ही भूत वस्तु असल्या मुळे जरी त्याचा स्वभाव निश्चित आहे, तरी ते प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय नव्हे. आणि ह्मणून * तू ते आहेस" या श्रुतिवचना शिवाय, जीवात्मा ब्रह्मस्वरूप आहे, ही गोष्ट समजणे शक्य नाहीं..