पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैदिक तत्त्वमीमांसा होय. ती वस्तु खांब आहे, हे मात्र तिच्या संबंधाने यथार्थ ज्ञान. कारण ते त्या वस्तूच्या स्वरूपाला अनुरूप असे आहे. या प्रमाणे भूत वस्तू विषयींच्या ज्ञाना संबंधाने त्या भूत वस्तुच प्रमाणभूत मानल्या पाहिजेत. आणि असे कबूल केळे, मग ब्रह्म ही भूत वस्तु असल्या मुळे ब्रह्मविषयक ज्ञाना संबंधाने ब्रह्मरूप जी भूत बस्तु तच प्रमाणभूत मानिली पाहिजे. परंतु ब्रह्म ही भूत वस्तु असल्या मुळे ब्रह्मझाना संबंधानें अनुमानादि प्रमाणे देखील उपयुक्त आहेत, असे कबूल केल्या बरोबर अनुमानवादी पुढे सरसावून असे ह्मणेल की, ज्या प्रमाणे इतर भूत वस्तू विषयींचे ज्ञान प्रत्यक्षादि लौकिक प्रमाणांच्या योगाने प्राप्त होते, त्या संबंधाने श्रुतीची आवश्यकता लागत नाहीं; त्या प्रमाणेच ब्रह्मरूप जी भूत वस्तु तिच्या विषयींचे देखील ज्ञान त्याच प्रमाणांच्या योगाने होईल, त्या संबंधाने देखील श्रुतीची आवश्यकता लागते नाहीं-ननु भूत-वस्तुत्बे ब्रह्मणः प्रमाण-अन्तर-विष4 यत्वं एव, इति बेदान्त-वाक्य-विचारणा अनर्थका एव प्राप्ता ।। ( शारीरकभाष्य, १।१।२ ) झणजे, * ब्रह्म ही भूत वस्तु आहे असे जर कबूल केले तर ती इतर ( ह्मणजे प्रत्यक्षादि) प्रमाणांचा विषय आहे असे देखील कबूल केलेंच पाहिजे. आणि असे कबूल केले ह्मणजे मग श्रुतिवचनांचे विवेचन करणे हे ब्रह्मज्ञाना संबंधाने अनावश्यक होय. यां आक्षेपाला उत्तर असे की:-न । इन्द्रिय-अविषयत्वेन संबन्ध–अग्रहणात् । स्वभावतः विषय-विषयााण इन्द्रियाणि, ने. ब्रह्म-विषयाण । सति हि इन्द्रिय-विषयवे