पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० वैदिक तत्त्वमीमांसा या वरून असे सिद्ध होते की, ब्रह्मविषयक ज्ञाना संबंधार्ने श्रुतिच प्रमाणभूत मानिली पाहिजे.' वरील विवेचनां वरून, ब्रह्मज्ञाना संबंधाने श्रुति प्रमाणभूत मानिली पाहिजे, हैं जें शंकराचार्यांचे व रामानुजाचार्यांचे मतं, त्या संबंधाने दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक गोष्ट ही कीं, श्रुती मध्ये जी ब्रह्मविषयक वचने आहेत, त्यांचे जर मुळीच साहाय्य घेतलें नाहीं तर,-ब्रह्म हे जगाचे एकच निमित्तकारण व उपादानकारण,-या सिद्धांताचे ज्ञान केवळ प्रत्यक्षादि लौकिक प्रमाणांच्या योगाने कधीही कोण त्यही मनुष्याला प्राप्त होणे शक्य नाही. दुसरी गोष्ट अशी की, जरी वरील सिद्धांता विषयींचे ज्ञान प्राप्त होण्याला श्रुतीचे साहाय्य अपरिहार्य आहे; तरी प्रत्यक्षादि लाकिक प्रमाणांच्या साहाय्या शिवाय केवळ श्रुतिवचनां पासून ते ज्ञान प्राप्त होणे कधीही कोणत्याही मनुवाला शक्य नाही. या दोन गोष्टींपासून निघणारा सिद्धांत असा की, पूर्वी निर्दिष्ट केल्या प्रमाणे, ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होण्याला । श्रृंयादि प्रमणें अनुमानादि प्रमाणे, या दोन्ही प्रकारच्या प्रमाणांचे साहाय्य घेतले पाहिजेः--वाक्यार्थ-विचारणा–अध्यवसान निवृत्ती हि ब्रह्म-अवगतिः । न अनुमानादि-प्रमाण-अ- ता। सत्सु तु वेदान्त-वाक्येषु जगतः जन्मादि-- कारण-वादिषु तत्-अर्थ-ग्रहण-दाढ्यय अनुमानं आप वेदान्त-वाक्य--अविरोध प्रमाणं भवतु न निवार्यत । ऋत्या एव च सहायत्वेन तर्कस्य अभ्युपेतत्वात् । तथाहि श्रोतव्यः मन्तव्यः । इति श्रुतिः....पुरुष-मुछि