पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १०७, गभूत नव्हते, तर ब्रह्मज्ञाना संबंधानें प्रसंगानुसार श्रत्यादि व अनुभव अनुमान इत्यादि सर्व प्रमाणांची आवश्यकता लागते. कारण ब्रह्मसाक्षात्कार में ब्रह्मज्ञानाचे साध्य असून, ब्रह्मरूप जी भूत वस्तु ती त्या ज्ञानाचा विषय आहे. आचरणरूप जे विषय त्या विषयींच्या ज्ञाना संबंधानें श्रुत्यादि मात्र प्रमाणभूत मानल्या पाहिजेत. कारण आचरणरूप ज्ञाना संबंधाने अनुभवाची आवश्यकता नाही, व आचरणरूप जो विषय त्याची विद्यमानता मनुष्याच्या इच्छे वर अवलंबून असते. व्यवहारविषयक किंवा धर्म विषयक जी कृत्ये त्यांच्या मध्ये एक देखील असे कृत्य नाहीं की, ते करणे किंवा न करणे किंवा अन्य रीतीनें करणे, यां पैकीं पाहिजे तो पक्षांतर शक्य नसते. आणि या करितांच कर्तव्या संबंधाने बिधि, निषेध, विकल्प, नियम, अपवाद्, हे निरर्थक होत नाहींत. परंतु कोणत्याही भूत वस्तू संबंधानें, ती अशी आहे किंवा ती अशी नाहीं किंवा ती विद्यमान नाही, हे पक्षांतर संभवत नाहींत. कारण हे सर्व पक्षांलर मनुष्याच्या कल्पनाशक्ती वर अवलंबून राहतात; परंतु कोणत्याही भूत वस्तू संबंधानें जें यथार्थ ज्ञान ते मनुष्याच्या कल्पने वर अवलंबून राहत नाहीं; ते त्या वस्तूच्या स्वरूपा वरच अवलंबून राहते. उदाहरणार्थ, आपल्या पुढे जर स्थाणुरूप एकच भूत वस्तु आहे; तर ती वस्तु स्थाणु ह्मणजे खांब आहे किंवा पुरुष आहे किंवा दुसरे कांहीं आहे, हे पक्षांतर या वस्तू संबंधाचे यथार्थ ज्ञान नव्हे. ती वस्तु पुरुष आहे किंवा दूसरे कांहीं आहे, हे तिच्या विषयांचे मिथ्या ज्ञान