पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वैदिक तत्त्वमीमांसा


आपणांला डॉ. केअर्डचीं मतें समजलीं. तर इतकेंच ह्मणतां येईल कीं, डॉ. केअर्डच्या मतें कँटचीं तत्त्वविषयक काय मर्ते होतीं तें आपणांला समजलें, परंतु असें असर्णे शक्य आहे कीं, डॉ. केअर्डनीं जीं कँटचीं मतें असें प्रतिपादन केले आहे, तीं किंवा त्यांपैकी पुष्कळ मतें त्यांना स्वत:ला मान्य नसतील. याकरितां प्रथमदर्शनी शंकराचार्या संबंधानें (व रामानुजाचार्यांसंबंधानें ) देखील असें ह्मणतां येईल कीं, त्यांच्या भाष्यरूप ग्रंथांत मूळ ग्रंथकारांची हाणून जीं


 (१) आणि याकरितांच एका तात्त्विक-धर्म-इतिहासकाराने डॉ. केअर्डच्या मतांसंबंधानें असें ह्यटलें आहे: - It might be that the amplest view of Dr. Edward Caird's method would be obtained by collecting what he says in his voluminous commentary on Kant, though it would be difficult in places to decide whether what is said is in elucida tion of Kant or is the commentator's own opinion......I have felt a special difficulty in attempting to indicate Dr. Caird's position. .... When a theologian presents his results, interwoven not only with his own philosophy but also with that of another in an intricate network of exposition and criticism......we have not before us the scheme of a Theism. Dr. Galdecott's The Philosophy of Religions प्र. १५००१.)