पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० वैदिक तत्त्वमीमांसा २।१।३७) तस्मात् आत्मैकत्वपक्षः एव सर्व-दोष-अभाव इति सिद्धम् ॥ ( शारीरकभाष्य, २।३।५३ ) ह्मणजे, श्रुती मध्ये प्रतिपादित जें तत्त्वज्ञानविषयक मत ते अत्यंत निर्दोष आहे, त्याच्या विरुद्ध कोणताही आक्षेप घेता येणार नाही. । वरील विवेचना वरून असे स्पष्ट होते की, तत्त्वज्ञान मिळविण्याचे मूळ साधन श्रुतिच, असे जरी शंकराचार्य व रामानुजाचार्य प्रतिपादन करितात; तरी श्रुतिग्रंथां मध्ये जें तत्त्वज्ञानविषयक मत प्रतिपादन केले आहे, त्या मताच्या समर्थना करितां अनुमानादि प्रमाणांची आवश्यकता लागते, ही गोष्ट त्यांना कबूल आहे. आणि ह्मणूनच रामानुजाचायनीं क्लटलें आहेः-अतीन्द्रिये अर्थे शास्त्रं एव प्रमाणम् । तत्-उपबृंहणाय एव तर्कः उपादेयः । तथा च आह ।। * आर्षे धर्मोपदेशं च वैदशास्त्र-अविरोधिना । यः तण अनुसंधत्ते स धर्म वैद नेतरः । इति, वेदाख्य-शास्त्रअविरोधिना इत्यर्थः ॥ ( श्रीभाष्य, २।१।१२ ) ह्मणजे, * जो इंद्रियांचा विषय नव्हे, अशा विषया संबंधानें श्रुति च प्रमाणभूत मानिली पाहिजे. आणि श्रुती मध्ये केलेल्या प्रतिपादनाचे समर्थन करण्या करितां अनुमानादि प्रमाणांचा उपयोग केला पाहिजे. या करितांच असें ह्मटले आहे की, * ऋषींनी केलेला व परमार्थविषयक जो उपदेश त्या उपदेशाचे, श्रुतीच्या विरुद्ध नव्हे अशा, तकनें जो मनुष्य समर्थन करू शकेल, त्यालाच धर्मशास्त्र समजले इतरांना नाहीं. " या वचनांतील वेदशास्त्र या शब्दाचा अर्थ वे वामक शास्त्र असा केला पाहिजे.!