पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १०१ वरील विवेचना संबंधाने लक्षात ठेवावयाची मुख्य गोष्ट अशी नव्हे की, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी अनुमानादि प्रमाणांच्या योगाने स्वतःच्या मताचे समर्थन करण्या करितां व प्रतिपक्षांच्या मतांचे निराकरण किंवा खंडन करण्या करितां, जे प्रतिपादन केले आहे ते निर्दोष आहे, किंवा निर्दोष नाहीं. तर एवढीच की, जर । शंकराचार्य व रामानुजाचार्य है तत्त्वविषयक ज्ञाना संबंधानें श्रुतिग्रंथ प्रमाणभूत मानितात; तरी,-केवळ अनुमानाच्या योगाने जी तत्त्वज्ञानविषयक मते प्रतिपादिली जातात त ज्या मानाने वेदांत दर्शनाच्या विरुद्ध असतील त्या मानाने ती असत्य आहेत, व अनुमानमूलक असे जे वेदांत दर्शना विरुद्ध आक्षेप घेतले जातात ते सर्व निराधार असून, वेदांत मत प्रत्यक्षादि, प्रमाणांच्या योगाने सिद्ध होणान्या गोष्टी विरुद्ध नाही, असे सिद्ध करण्या करितां ते दोघेही अनुमानाचेच अवलंबन करतात. हीच गोष्ट दुस-या शब्दांनी अशी व्यक्त करितां येईल की, जरी शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते तत्त्वविषयक ज्ञान प्राप्त करून घेण्याला श्रुति हेच एक साधन आहे; तरी ते असेही मान्य करितात की, जे वेदांत दर्शन मान्य करीत नाहीत त्यांच्या कडून ते मान्य करविण्याला, व इतरांनी घेतलेल्या आक्षेपां मुळे ज्यांना ते मान्य आहे अशा मनुष्यांच्या मनांत त्या दर्शनाच्या सत्यते विषयी संशय उत्पन्न होण्याचा संभव आहे एतदर्थ त्या आक्षेपांचे निराकरण करण्याळा, अनुमानादि प्रमाणांचे साहाय्य घेतलेच पाहिजे..