पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य । ९९ प्रतिज्ञा करून शेवटीं असा उपसंहार केला आहेः-चेतनं ब्रह्म जगतः कारणं प्रकृतिः च, इति अस्मिन् अवधारितैः वेदार्थ परैः उपक्षिप्तान •०००दोषान् पर्यहार्षीत् आचार्यः ॥ ( शांकरभाष्य, २।१।३७) झणजे, चिन्मय जें ब्रह्म तेच सर्व जगाचे निमित्त-कारण व-उपादन कारण होय, हा जो वेदांताचा निश्चित सिद्धांत, त्याच्या विरुद्ध प्रतिपक्ष कडुन जे आक्षेप घेतले जातात, त्या आक्षेपांचे आचार्यांनी * झणजे सूत्रकारांनी ) येथ पर्यंत निराकरण केलें.' उक्तं जगत्-जन्मादि-कारणं परं ब्रह्म इति । तत्र परैः उद्भाविताः दोषाः च परिहृताःः ॥ (श्रीभाष्य, २२।१ ) ह्मणजे, * जगाच्या उत्पत्तीचें स्थितीचे व याचे कारण ब्रह्म असे प्रथम प्रतिपादन करून, नंतर प्रतिपक्षां कडून या मता विरुद्ध घेतले जाणारे जे आक्षेप त्यांचे निराकरण केलें.' - सारांश, चिन्मय ब्रह्म हैं एकच सर्व जगाचे निमित्त कारण व उपादान-कारण, हा सिद्धांत श्रुती मध्ये प्रति पादन केलेला आहे; एवढेच नव्हे, तर त्या सिद्धांता विरुद्ध कोणताही आक्षेप घेतला जाणे, किंवा ता सिद्धांत सदोष आहे असे कोणत्याही रीतीने ठरविणे, शक्य नाहीं; असे शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी प्रतिपादन केले आहेःन एव अस्मदीये दर्शने किंचित् असामंजस्यं अस्ति ।.... तस्मात् समंजस इदं औपनिषदं दर्शनम् ॥ ( शारीरकभाष्य, २।१।९) न खलु अस्मत्पक्षे कश्चित् अपि दोषः अस्ति । .... तस्मात् अस्मत्पक्षे न कश्चित् अपि दोषप्रसंगः अस्ति ॥ (शारीरकभाष्य, २॥१॥२७) अनतिशंकनीयं इदं औपनिषदं दर्शनम् ॥ ( शारीरकभाष्य,