पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैदिक तत्त्वमीमांसा नव्हे. ननु शब्देन अपि न शक्यते विरुद्धः अर्थः प्रत्याः ययितुम् ॥ (शारीरकभाष्य, २।१।२७) ह्मणजे, * जी गोष्ट आत्मविरुद्ध आहे ती सत्य आहे, असे श्रुति देखील सिद्ध करू शकणार नाहीं. पुनः अपि....तर्क अवलंबमानः प्रत्यवतिष्ठते यत् ....जगतः ब्रह्मकार्यत्वं उक्तं तत् न उपपद्यते ।। ( श्रीभाष्य २।१।४ ) झणजे, ' पूर्वपक्षी तर्काच्या साहाय्याने पुनः असा आक्षेप घेतो की,—जग हे ब्रह्माचे कार्य,-हे मत सयुक्तिक नव्हे.' * या प्रमाणे उपोद्घात करून, अनुमानवादी पक्षा कडून वैदांत दर्शना विरुद्ध जे अनुमानमूलक आक्षेप घेतले जाते असत, किंवा घेतले जाण्या सारखे आहेत,-यांचे शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी निराकरण केले आहेः–ब्रह्म अस्य जगतः निमित्तकारणं प्रकृतिः च इति एतस्य पक्षस्य आक्षेपः स्मृतिनिमित्तः परिहृतः । तर्कनिमित्तः इदानीं आक्षेपः परिन्हियते ॥ ( शारीरकभाष्य, २।१।४ ) ह्मणजे, * ब्रह्म हैं या जगाचे निमित्त–कारण व उपादान-कारण, या वेदांत मता विरुद्ध स्मृतीच्या आधाराने जे आक्षेप घेतले जातात. त्यांचे निराकरण झालं, आतां त्या मता विरुद्ध तकच्या आधाराने जे आक्षेप घेतले जातात, त्यांचे निराकरण करावयाचे.' अस्य अर्थस्य संभावनीय-समस्तप्रकार-दुर्धर्षणव-प्रतिपादनाय द्वितीयः अध्यायः आरयते ।। ( श्रीभाष्य, २।१।१ ) ह्मणजे, ‘हा सिद्धांत सदोष आहे असे कोणत्याही रीतीने सिद्ध केले जाणे शक्य नाही, असे स्पष्ट करून दाखविण्या करितां दुसन्या अध्यायाळा आरंभ केला आहे, अशी दोघांनीही आरंभ