पान:वेरुळ.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९


उतरण्याची वगैरे कांहीएक काळजी नव्हतीच. त्या ठिकाणी चांदबिबीचा महाल म्हणून एक टेंकडीवर इमारत आहे ती, नगरचा किल्ला वगैरे पहाण्यासाठी पासेस वगैरे आणवून ठेवण्याची सर्व व्यवस्था झाली होती.

 पुण्याहून आम्ही सुमारें ६ वाजतां निघालों ते १० वाजण्याचे आधीच नगरपाशी पोहोंचलों. पंडितराव, मुळे हे नगरची कांही मंडळी घेऊन सामोरें आले होते, त्यांबरोबर आह्मी गांवांत गेलों.

 आमच्या येण्याचा वाजागाजा रा. मुळे यांनी विनाकारण अधिक करून ठेवला होता. त्यामुळे अनेक मंडळी, कांही स्वयंसेवक, कांहीं फरारे, निशाणे इत्यादि थाट केला होता. आम्हांस एकंदर प्रकार आवडला नाही. परंतु परक्या गांवांत गेल्यावर इतक्या सडेतोडपणाने वागतां येत नाही. गेल्याबरोबर आझांला एके ठिकाणी ब्राह्मणवर्ग- माध्यंदिनांतर्फे पानसुपारी झाली. त्या वेळी कांही मंडळींच्या ओळखीही करून देण्यांत आल्या.

 या वेरूळ-अजंठ्याच्या प्रवासांत ज्या ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम केला त्या त्या प्रत्येक ठिकाणी लोकांनी आमच्याविषयी अत्यंत आदर व प्रेम दाखविलें.

 नगर येथें तर आह्मांस इतक्या संस्थांना भेटी द्यावयाच्या होत्या, व इतक्या ठिकाणी पानसुपारीस आणि पहावयास जावयाचें होतें, की दोन प्रहरी दोन वाजल्या- पासून रात्री सुमारे आठनऊ वाजेपर्यंत आह्मी सारखे फिरत होतों; तरी काम आटपले नाहीं. शेवटी आमचा मंगळवारचा उपवास असल्या कारणाने तेथील मंडळींसच जरा चमत्कारिक वाटून, तेथें आमचे सार्वजनिक जाहीर व्याख्यान होणार होते ते आम्हांस न विचारतांच त्यांनी रहित केले. वास्तविक आम्ही आणखीही एकदोन ठिकाणी जाऊन थोडें भाषण केलें असतें. सार्वजनिक भाषण आह्मांला न विचारतां रहित केल्याबद्दल आह्मांस वाईट वाटलें.

 उपोषणाच्या दिवशीं खरें झटले तर माणसास जास्त तरतरी असते, असा आमचा अनुभव आहे. आणि ह्मणून त्या दिवशी मंगळवारच्या उपोषणामुळे पोट रिकामें होतें, आळस येण्याचे कारणच नव्हतें, या कारणानें पुण्यास पहांटे दोन वाजतां निजून उठल्या-