पान:वेरुळ.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८

 जेजुरी येथे आम्हांस थांबावें लागले. मागील चार मोटारी आल्या नाहींत. त्या अवधीत डोंगरावर जाऊन श्री खंडेरायाचें दर्शन घेऊन यावें असें मनांत आलें. पण नाकेवाल्यानें सांगितले की, माणशी कर आहे. पूर्वी यात्रेच्या वेळींच फक्त कर घेत असत.पण आतां बारा महिने कर बसला आहे. कर देऊन वर जावें असा श्री. खंडेरायाचा हुकूम झाला नाहीं. म्हणून आम्ही गेलो नाहीं. सौ. राणीसाहेब यांचें ‘ वर दर्शनास जाऊं या,' चाललेच होतें. पण आम्ही तें कबूल केले नाहीं. तेथील दृश्याचा एक ऑटोकोम मात्र घेतला.

 वाटेनें ठिकठिकाणचे रंगीत फोटोग्राफ्स घेण्याकरितां ऑटोक्रोम - कांचा बऱ्याच बरोबर घेतल्या होत्या. पण मार्च महिना म्हणजे एकंदर उन्हाळाच असल्यामुळे वाटेनें घेतलेले बहुतेक सर्व ऑटोक्रोम्स बिघडले. एक सुद्धां चांगला आला नाहीं. त्यांतल्यात्यांत जेजूरीचाच कांहीं बरा. त्यावरही अनेक पिनहोल्स् आली आहेत.

 आम्ही पुण्यास जाऊन पोहोंचलों. रा. सा. बाजीराव गुत्तीकर पहांटेंच तेथें आले होते. त्यांनींच आमच्या वाड्यांत आमचें स्वागत केलें. चि. बाळामहाराज व चि. पंढरीनाथही त्या पहांटेंच मुंबईस सर्व सामानसुमान खरेदी करून तेथे आले होते.

 मागाहून मोटारी येत होत्या, त्यांतील मंडळींनीं मध्यें फराळ केल्यामुळे त्यांस यावयास चांगला दीड तास उशीर झाला. नंतर आमचे सोमवारचे फराळ व बाकी सर्व मंडळींची जेवणें वगैरे झालीं. जेवणाची तयारी रा. बापट, वहिवाटदार पुणे वाडा यांनी केली होती.

चि. श्रजिगन्नाथमहाराज येऊन त्यांनी सर्व मंडळींस रात्रीचे भोजनास त्यांच्या वाड्यांत यावयाचें म्हणून आमंत्रण दिले. याप्रमाणे आगाऊ ठरलेंच होतें.

 पुण्याहून आम्ही फार लवकर निघालों. श्रीजगन्नाथ महाराज यांनीं मोटारीतून परस्पर नगरच्या वाटेनें यावें; आम्ही त्यांची अगर त्यांनी आमची वाट पाहूं नये असें ठरलें होतें. त्याप्रमाणे आम्ही सहा मोटारी घेऊन निघालों.

 रा. पंडितराव हिवरेकर, ज्यांच्या पाहुण्याकडे आम्ही नगरास उतरणार होतों ते आणि रा. मुळे हे नगरास आधीच मोटारसर्विसनें गेले होते. तेव्हां नगरच्या मुक्कामाची