पान:वेरुळ.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७


" १० " " सकाळी ६ वाजतां नगराहून निघून १० वाजतां
  औरंगाबादेस पोहोचणे. दुपारी पैठणास जाऊन येणे.
  संध्याकाळी मुक्काम औरंगाबादेस.

" ११ " " सकाळी दौलताबादचा किल्ला वगैरे पाहून परत औरंगा-
  बाहेस येणें. दुपारी जेवण करून वेरुळास जाणे.
तारीख ११।१२।१३

 मार्च १९२६ वेरूळास मुक्काम.

" १४ " " वेरुळाहून दुपारी १२ वाजतां निवून अजंठ्यास
 ४ वाजतां पोहोचणे.

 या प्रोग्रॅममध्ये निघाल्यापासून फारसा फरक झाला नाही. वेरूळच्या मुक्कामा- पर्यंतही प्रोग्रॅमप्रमाणें बहुतेक चाललें असें ह्मणावयास हरकत नाही. मात्र वेरुळाहून अजंठ्यास जाणे आणि तेथून लेणी पहाणें वगैरेमध्ये, मागें लिहिल्याप्रमाणे रस्त्यासंबंधी प्रथमपासूनच जो गैरसमज झाला होता, त्या कारणानें फरक साहजिकच झाला.

 तारीख १ मार्च सोमवार रोजी चि. श्रीबाळामहाराज व चि. पंढरीनाथ मुंबईस अजंठा येथे चित्रांच्या नकला करणेकरितां लागणाऱ्या सामानाचे खरेदीकरितां गेले.
 तारीख ७ मार्च रोजी रा. लक्ष्मणराव किर्लोस्कर आपल्या माणसांसह औंधास आले. आणि तारीख ८ मार्च सोमवार रोजी आह्मी सहा मोटारी घेऊन सकाळी सहा वाजतां औंधाहून निघालों ते सुमारें १२ वाजतां पुण्यास सुखरूप पोहोचलो. जातांना नेहमींच्या नव्या पुणे-साताऱ्याचे रस्त्यानें न जातां जुन्या पुण्याच्या रस्त्यानें गेलो. हा रस्ता सातायाहून वडूथ -आरळ्याहून लोणंदावरून, जेजूरीवरून पुण्यास जातो. रस्ता चांगला आहे असा आमचा समज होता. मागें बारामतीस कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्सच्या बैठकीसाठी आह्मी गेलों होतों त्या वेळीं नीरानदीपर्यंत याच रस्त्याने जावे लागते, त्या वेळीं तो इतका वाईट नव्हता. निदान वाटला नाहीं. पण या खेपेस लोणंदपर्यंत रस्ता बराच खराब झालेला दिसला. मग काय, दोन वर्षांत रिपेअर कमी झाली की काय समजत नाहीं.