पान:वेरुळ.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२

चला ह्मणून सांगितलें. त्यांना त्या गोष्टीचा आनंदच झाला. पण दुसरे दिवशीं पांडोबा हळूंच ह्मणाले " आह्मी निम्या वाटेवर जातोंच आहोत, त्याअर्थी आह्मी तसेंच प्रयाग आणि काशी येथे जाऊन येतों. आमचा दोन महिन्यांचा पगार येणें आहे, तेवढा दिला ह्मणजे आह्मी एकदां यात्रा करून येतो. पुन्हां आमचे त्या प्रांतांत जाणें होणें दुर्घट आहे."

 तीर्थयात्रेचा प्रश्न ! नाहीं कशाला ह्मणा ! ह्मणून 'आमची कांही हरकत नाहीं. तुमचा पगार तुम्हाला देण्याविषयीं हुकूम करतों. पण आतां तुझी ज्याअर्थी काशीपर्यंत जाणार, त्याअर्थी प्रयाग, काशी, गयेबरोबर उत्तर हिंदुस्थानांतील इतर प्रेक्षणीय स्थळे तरी पाहून या. चाळीस पन्नास रुपयांसाठीं नाहीं ह्मणूं नका. काशीहून अयोध्या, लखनौ, मथुरा, गोकूळ, वृंदावन, अग्रा, दिल्ली, जयपूर इतकीं स्थळे पाहून या. ज्या ज्या ठिकाणीं तुम्ही जाणार त्या त्या ठिकाणी लागेल ती मदत करण्यास व लागल्यास कांहीं पैसेही देण्यास, काशी, दिल्ली, जयपूर येथे पत्रे देतों,' असे आह्मी त्यांस सांगितले. ती गोष्ट त्यांच्याही मनास आली.

 काशी येथील बिंदुमाधवाचे संस्थान औंध संस्थानच्या देखरेखीखाली आहे. आणि त्या संस्थानासंबंधी खर्च होणारी रक्कमही संस्थानांतूनच खर्ची पडते. काशी फार लांब असल्या कारणानें त्या संस्थानची तपासणी करण्याचें काम इतर संस्थाप्रमाणें आणि तालुक्याप्रमाणे कधीच होत नाहीं. केव्हां कोणी काशीला गेला तर तो यात्रेच्या गडब- डींत आणि गंगापुत्रांच्या तावडीत सांपडलेला असतो. बिंदुमाधव संस्थानचा कारभार कसा चालला आहे, लिहिणेपुसणे बरोबर आहे की कसें; जमाखर्चाचा मेळ आहे किंवा नाहीं, भांडीकुंडीं दागदागिने, कपडेलत्ते, यांची मोजदाद आहे किंवा काय वगैरे आजप- र्यंत कोणी पाहिलेच नाहीं, झटले तरी चालेल.

 देवस्थानखाते हल्लीं रा. रामचंद्र गणेश हिवरेकर, सेक्रेटरी होम डिपार्टमेंट यांच्या ताब्यांत आहे. 'यंदा तपासणी करावयास काशीस जावें, असा हेतु आहे, हुकूम व्हावा' झणून त्यांनी आमच्याकडे रिपोर्ट केला. 'बजेटांत खर्चाची सवड असल्यास जा.' असा त्यांना हुकूम देण्यांत आला.

 अर्थात ते आमच्या बरोबर वेरूळ, अजंठा येथपर्यंत येऊन नंतर जळगांवाहून पुढे जाणार असे ठरले. त्यांना पांडोबा पाथरवट व त्यांचा मुलगा महादेव यांची सोबत