पान:वेरुळ.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमचा एक प्रकारचा हक्क होता. त्यांसही 'आझी अजंठा पहावयास जाणार आहोत, आमची एकंदर व्यवस्था तुझी ठेवली पाहिजे ' ह्मणून कळविलें. आणि 'आझी कोठें उतरावें; तुह्मास आमची काय काय सोय करता येईल' ह्मणून त्यांस विचारलें. त्यांजक- डूनही " मोठ्या आनंदानें शक्य ती स्वारीची सोय करण्याची खटपट करतो " ह्मणून उत्तर आलें.

 मोटारीच्या रस्त्याचा ह्मणून जो नकाशा आहे, त्यावर औरंगाबादेहून अजंठा पन्नास पंचावन मैल आणि उत्तम मोटारेबल् रस्ता अशी जाड तांबडी खूण केलेली आहे.

 आह्मी पूर्वी गेलो होतों ते जळगांवाहून टांग्यानें गेलो होतों. औरंगाबादचा रस्ता त्या वेळी कदाचित् अस्तित्वांतही नसावा असे वाटतें. ह्मणून केवळ नकाशा पाहूनच मोटारीनें औरंगाबादेहून अजंठा येथे जावे असे आह्मी ठरविलें.

 ह्या नकाशावर आह्मी भरंवसा ठेवला व अनेक लोकांनी तिकडून रस्ता चांगला नाही असे सांगितलें. वेरूळच्या लेण्यांमधील केअरटेकर आणि वेरूळचा तहशिलदार यांनी प्रत्यक्ष सांगितलें. तरीही त्यावर विश्वास ठेवला नाही. सर्वांचें सांगणे असे पडलें की वेरूळाहून जळगांव व जळगांवाहून फरदापूर अशा रस्त्यानें जावें. फरदापूर येथे एक बंगला उत्तम आहे. तेथून लेणीं चार मैल आहेत. पण आह्मी कोणाचेंही ऐकलें नाहीं.

 याप्रमाणे जाण्याचा बेत नक्की झाल्यावर आह्मी समक्ष भेटीत पोलिटिकल एजंटसाहेब यांस कळविलें व लेखीही लिहिले. निजामच्या परराज्यांत जाऊन रहावयाचें. तिकडे कांहीं झालें सवरलें तर बंदोबस्त असावयास पाहिजेच होता. रेसिडेंटामार्फत तिकडील दरबारच्या आर्किऑलॉजिकल डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार वगैरे झाला. त्यांच्याकडूनही ज्या ज्या ठिकाणी आमचा मुक्काम व्हावयाचा होता त्या त्या गांवीं तालुकदार, तहशील- दार, केअरटेकर, क्यूरेटर वगैरे अधिका-यांस आमचा "इंतजाम" बरोबर ठेवण्याविषय हुकूम गेले. दरम्यान, राजूरकर ह्मणून कोणी हैदराबादेमध्ये कामगार आहेत, त्यांनीं आह्मास पत्र लिहून भेटीची अपेक्षा दर्शविली. व आह्मी तिकडे जाणार त्या वेळीं सर्व बंदोबस्त खासगी आणि निजामसाहेबांचे दरबारमार्फत उत्तम ठेवण्याविषयों आह्मास वारंवार लिहू लागले.