पान:वेरुळ.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ ) अजंठाची लेणीं.

 अजंठा येथील लेणी फक्त एकदांच आणि तीही तीनचार तासच आह्मी पाहिली होती; हें वर लिहिलेंच आहे. लेडी हॅरिघॅम, फर्ग्यूसन वगैरे लोकांनी काढलेल्या चित्रांचीं पुस्तकें पाहून आपल्या चित्रसंग्रहामध्येही तेथील चित्रांच्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष काढून घेतलेल्या कांहीं नकला असाव्यात, असें आम्हांस बरेच दिवस वाटत होतें.

 हिंदुस्थानांतील जुन्या चित्रांचा संग्रह करण्याचें आमचें काम आज दहा वर्षांवर चालले आहे. निरनिराळ्या कलमांची (schools) दोन तीनशें चित्रे सुव्यवस्थित कॅटेलॉग करून लावलेली आमच्या संग्रही आहेत.

 यांतच अजंठा येथील शेपन्नास चित्रांच्या नकला उत्तम अस्सलबरहुकुम काढ- लेल्या असाव्यात असा आह्मी विचार फार दिवस करीत होतो. पण त्याला मूर्तस्वरूप दुसन्या अनेक अडचणींमुळे आजपर्यंत आलें नाहीं.

 मुख्य अडचण अर्थात् खर्चाची, योग्य चित्रकार काम करावयास मिळण्याची आणि आमच्या फुरसदीची होती. पण :-

"सत्य संकल्पाचा दाता नारायण ।
सर्व करी पूर्ण मनोरथ ॥


 या साधुवचनाप्रमाणे आमच्या उत्कट इच्छेला या वर्षी मूर्तस्वरूप मिळाले.आणि गेल्या (१९२५) दिसेंबरमध्येच १९२६ च्या फेब्रुवारीमध्यें अजंठ्याला जावेंच असें मनाला वाटूं लागले. त्या अन्वये गोष्टी निघूं लागल्या. खर्चाचा साधारण अंदाज बांधण्यांत येऊं लागला.रेल्वेने जावे कां मोटारीनें जावें याचीही भवति न भवति होऊं लागली.

 आम्ही जाणार म्हटल्या बरोबर सौ. राणीसाहेब " आम्ही येणार " म्हणाल्या. अशा ठिकाणी वारंवार जाणे होत नसतें. कधी नव्हत एकदां जाणार; अर्थात् त्यांना