पान:वेरुळ.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


सर्व ठिकाणी त्या त्या संस्थानांकडून रहदारी बंगले, त्या ठिकाणी खाण्याचे सामान, त्या जागांना जावयाला रस्ता वगैरे सर्व सोई अत्यंत उत्तम करण्याविषयी ती ती संस्थाने अत्यंत काळजी घेतात.

 मुख्य कारण या प्रसिद्ध ठिकाणी व्हाइसरॉय एकदां अगर दोनदां तरी पांच वर्षांमध्ये येऊन जातातच, असें लॉर्ड कर्झन साहेबांच्या वेळेपासून ठरून गेल्यामुळे, आणि इतरही लहानमोठे कामगार वारंवार येत जात असल्यामुळे स्वच्छता, डागडुजी वगैरे करणे अवश्य आणि इष्ट असतें.

ह्मणून, आणि हल्लींच्या काळीं सर्व जगाबरोबर आह्मां संस्थानांनाही सुधारणेचा निदान देखावा तरी करावा लागतो. यामुळे “ आर्किऑलॉजिकल डिपार्टमेंट " म्हणून बड्या नावाखाली कांहीं ऑफिसर्स, कांहीं कारकून, कांहीं क्यूरेटर्स, केअरटेकर्स, पट्टेवाले, वगैरे स्टाफ ठेवावा लागतो.

 ह्रीं मागसें काम किती आणि कोणत्या प्रकारचें करतात हा प्रश्न निराळा. पण आतांशा अगदी कामावांचून नुसतां केवळ देखावाच फार दिवस पटणे शक्य नसते. ह्मणून, अलीकडे अलीकडे, या कामगारांना बरेंच काम करावें लागतें. आणि कामगार नेमलेले असतात, तेही बरेच लायख लोक नेमलेले असतात, असा आह्मांला यंदांतरी अनुभव आला.

 निजाम सरकारच्या राज्यामध्ये असलेली अजंठा आणि वेरूळ येथील लेणी एका क्यूरेटरच्या ताब्यांत आहेत. तो मुंबईच्या स्कूल ऑफू आर्ट्सचा विद्यार्थी असून चांगला चित्रकार आहे. बऱ्याच वर्षांच्या सहवासानें आणि सर जॉन मार्शल वगैरे नामांकित आर्किऑलॉजिस्ट यांच्या वारंवार साहचर्यानें त्याला आतां बरी नजर आली आहे व त्यानें अजंठा येथील लेण्यांची व्यवस्था चांगली ठेवली आहे, असे आह्मांस आढळून आलें.

 त्याच्या हाताखाली एक केअरटेकर असतो, तो वेरूळ, औरंगाबाद येथील लेणीं वगैरेची व्यवस्था पहात असतो.

 निजाम सरकारच्या या उत्तम व्यवस्थेबद्दल खरोखरी निजाम सरकारचें अभिनंदन करणें अवश्य आहे.